Nashik News : देवदूतांइतके डॉक्‍टरांचे कार्य महत्त्वाचे : अण्णासाहेब मोरे

Nashik News : लेखानगर येथील एनएबीएच मानांकन प्राप्त लाइफ केअर हॉस्‍पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वोत्तम युरोपियन मानांकनासह अत्याधुनिक कॅथलॅब मशिनच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
Eminent and expert doctors present at launch of catlab machine at Lifecare Hospital.
Eminent and expert doctors present at launch of catlab machine at Lifecare Hospital.esakal

नाशिक : व्‍याधींनी त्रस्‍त रुग्‍णांना दिलासा देत, त्‍यांना संकटातून बाहेर काढण्याचे काम डॉक्‍टर करतात. डॉक्‍टरांचे कार्य हे देवदूताप्रमाणेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले. लाइफ केअर हॉस्‍पिटलद्वारे रुग्‍णांना दर्जेदार सेवा मिळत असल्‍याने त्‍यांनी मनोगतातून समाधान व्‍यक्‍त केले. (Nashik Annasaheb More statements about doctors work news)

लेखानगर येथील एनएबीएच मानांकन प्राप्त लाइफ केअर हॉस्‍पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वोत्तम युरोपियन मानांकनासह अत्याधुनिक कॅथलॅब मशिनच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी भाजप पदाधिकारी लक्ष्मण सावजी, शिवाजी चुंबळे, पी.बी. गायधनी, रंजन ठाकरे, सचिन मराठे उपस्थित होते.

लक्ष्मण सावजी यांनीही लाइफ केअर हॉस्‍पिटलच्‍या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. गेल्‍या अनेक वर्षांपासून रुग्‍णसेवेचे व्रत जोपासताना हजारो रुग्‍णांना हॉस्‍पिटलने दिलासा दिला असल्‍याचे समाधान त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

कार्यक्रमाप्रसंगी हृदयविकार तज्ञ डॉ. सुरेश पाटील, डॉ. सचिनकुमार पाटील, डॉ. महेश आहेर, डॉ. प्रसाद अंधारे, इंटरव्हेशनल रेडीओलॉजिस्ट डॉ. अमोल भालेकर, डॉ. मौनिल भुटा, हृदयरोग तज्ञ डॉ सत्यजित आहेर, बाल हृदय विकार तज्ञ डॉ संतोष वाडीले आदी उपस्‍थित होते.  (latest marathi news)

Eminent and expert doctors present at launch of catlab machine at Lifecare Hospital.
Loksabha Election 2024 : खैरे-दानवे यांच्यात दिलजमाई ; लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दोन तास चर्चा

रुग्‍णांसाठी आधुनिक सुविधा डॉ. मराठे

लाइफ केअर हॉस्‍पिटलचे संचालक व वंध्यत्व निवारण तज्‍ज्ञ डॉ. उमेश मराठे यांनी कॅथलॅबविषयीची माहिती दिली. नेहमीच रुग्‍णांना सर्वोत्तम दर्जाची सेवा देण्याच्‍या उद्देशाने हॉस्‍पिटल काम करत आहे. यासाठीच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कॅथलॅब उपलब्‍ध करून दिली असून, हृदयविकाराच्‍या रुग्‍णांना गुणवत्तापूर्ण उपचार मिळण्यास सहाय्यता हो होईल.

आत्तापर्यंत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत १८ हजारापेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्‍या असून, याद्वारे गरजू रुग्‍णांना हॉस्‍पिटलने दिलासा दिला आहे. आरोग्य सेवा देताना कुठलीही तडजोड न करता जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्‍याची ग्‍वाही डॉ.मराठे यांनी दिली.

Eminent and expert doctors present at launch of catlab machine at Lifecare Hospital.
Loksabha Elections 2024: ठाकरे गट-काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणाऱ्या ५ मतदारसंघांचा लेखाजोखा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com