Nashik Bazar Samiti : बाजार समितीत शेतकऱ्याला मारहाण; सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

nashik apmc farmer beaten up news
nashik apmc farmer beaten up newsesakal

Nashik Bazar Samiti : बाजार समितीमध्ये काही संशयितांनी कारण नसताना शेतकऱ्याला मारहाण केल्याची घटना घडल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात धाव घेत आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला. (nashik apmc farmer beaten up news)

परंतु सभा सुरू असल्याने शेतकऱ्यांना उभे केल्याने शेतकऱ्यांच्या संतापात भर पडली. शेतकऱ्यांची असलेल्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यालाच सपत्नीक वागणूक मिळत असल्याने बाजार समितीत नेमकी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शनिवार (ता. ३) सकाळी अकरा वाजता मातोरी येथील शेतकरी ओंकार पिंगळे हे शिमला मिरची घेऊन दिंडोरी रोडवरील नाशिक बाजार समितीमध्ये आले होते. मात्र, बाजार समितीमध्ये दारूच्या नशेत धूत असलेल्या सात ते आठ जणांच्या टवाळखोरांनी कुठलेही कारण नसतांना पिंगळे यांना बेदम मारहाण करत त्यांच्या अंगावरील कपडे फाडले.

या वेळी त्यांना सोडविण्यासाठी गेलेल्या काही शेतकऱ्यांनादेखील या टवाळखोरांनी मारहाण केल्याची घटना घडली असून, बाजार समितीच्या सुरक्षारक्षकांनी धाव घेत यातील एका संशयिताला पकडले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

nashik apmc farmer beaten up news
Shivsena: राऊतांच्या दौऱ्यादरम्यान राजकीय भुकंप! अख्खी नगरपंचायत शिंदे गटात; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

बाजार समितीत शेतकऱ्यांना मारहाण झाल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात धाव घेत सभापती देविदास पिंगळे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी सभा सुरू असल्याचे कारण देत सभागृहाचे दरवाजे बंद करून घेतले.

या वेळी संचालक जगदीश अपसुंदे यांनी सभागृहाबाहेर येत पीडित शेतकऱ्यांची भेट घेत त्यांना सभागृहात घेऊन गेले. मात्र, या दरम्यान शेतकऱ्यांना काय आश्वासन दिले याबाबत माहिती मिळू शकली नाही.

nashik apmc farmer beaten up news
11th Admission Process : अकरावी प्रवेशाची पहिली यादी 19 ला; अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रकिया या तारखेपासून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com