Nashik Teacher Constituency Election : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत 38 पैकी 2 उमेदवारांचे अर्ज अवैध

Nashik News : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२४ ची नामनिर्देशनपत्रांच्या छाननीची प्रक्रिया शांततेत पार पडली.
Application
Applicationesakal
Updated on: 

Nashik News : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२४ ची नामनिर्देशनपत्रांच्या छाननीची प्रक्रिया शांततेत पार पडली. ३१ मे ते ७ जून या कालावधीत ३८ उमेदवारांनी ५३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. त्यांपैकी ३६ उमेदवारांचे अर्ज वैध व दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. (Applications of 2 out of 38 candidates invalid in teacher constituency election)

अमोल बाळासाहेब दराडे आणि सारांश महेंद्र भावसार यांचे वय ३० वर्षांपेक्षा कमी वय असल्याने त्यांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरली आहेत. किशोर भिकाजी दराडे यांच्या शपथपत्राबाबत उमेदवार रणजित नानासाहेब बोठे यांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता.

तो कायदेशीर तरतुदीनुसार फेटाळण्यात आला. माजी आमदार किशोर दराडे यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली होती. (latest marathi news)

Application
Nashik Pre-Monsoon Rain : जिल्ह्याला मॉन्सूनपूर्व पावसाचा तडाखा; गेल्या वर्षीच्या तुलनेत जूनमध्ये आठपट अधिक पाऊस

मात्र त्यांचा अर्ज छाननी करून वैध ठरविण्यात आला. ३६ उमेदवार वैधरीत्या नामनिर्दिष्ट (पास) झालेले आहेत. ज्या उमेदवारांना माघार घ्यावयाची असेल ते उमेदवार १२ जूनला दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात.

Application
Nashik ZP News : ग्रामसेवकांच्या आंदोलनाबाबत जिल्हा परिषद प्रशासन अंधारात; आज होणाऱ्या बैठकीकडे ग्रामसेवकांचे लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Teachers Constituency
Pune Teachers Constituency
Gokul Milk Union Election Vishwas Patil Files Nomination With Five Others 15 Candidates Submit 19 Forms in Kolhapur
Karnataka 15000 teacher recruitment 2026
Marathi News Esakal
www.esakal.com