Nashik News : घरकुलाच्या 6 इमारतींना मंजुरी, बांधल्या दोनच! समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या भीमवाडीकरांचा आरोप

Nashik News : महापालिकेने याकडे लक्ष देत आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.
The site of the stolen building.
The site of the stolen building.esakal

जुने नाशिक : भीमवाडी परिसर अनेक वर्षांपासून समस्यांच्या विळख्यात असून येथे मंजूर घरकुलाच्या सहा पैकी दोनच इमारती बांधल्या असून उर्वरित चार इमारतींची चोरी झाल्याचे रहिवासी सांगतात. येथे सार्वजनिक शौचालयाच्या समस्येपासून तर ड्रेनेज सांडपाण्याच्या समस्यांपर्यंत रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे महापालिकेने याकडे लक्ष देत आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. (Nashik Gharkul Scheme Bhimwadi marathi news)

शहराच्या मध्यवर्ती भागात समस्यांच्या विळख्यात सापडलेला भाग म्हणून ओळख झाली आहे. जागोजागी सांडपाणी रस्त्यावर साचलेले दिसून येते. पावसाळ्यात अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होते. पाऊस आणि ड्रेनेजचे सांडपाणी रहिवाशांच्या घरांमध्ये शिरते. यामुळे रहिवाशांना रात्र जागून काढावी लागते.

ड्रेनेजची स्वच्छता होत नसल्याने दैनंदिन सांडपाणी रस्त्यावर साठून रोगराईला निमंत्रण मिळते. परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. अडीच ते तीन हजार लोकसंख्या असलेल्या भागात केवळ आठ सार्वजनिक शौचालये आहेत. त्यातील चार शौचालयांची दुरवस्था होऊन बंद पडले आहेत.

सुरू असलेल्या चार शौचालयांचीही अवस्था बिकट आहे. बहुतांशी पथदीप बंद असून जागोजागी कचऱ्याचे ढीग अशा एक ना अनेक समस्या येथे दिसून येत आहेत. एकीकडे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे. तर दुसरीकडे अशा प्रकारची परिस्थिती बघावयास मिळत आहे. (Latest Marathi News)

The site of the stolen building.
Nashik News : पुन्हा एकदा ‘टोलचा झोल’ उघड! वाहन घरीच, तरी मोबाईलवर टोलपावती; त्र्यंबकेश्वरच्या ग्राहकाची फसवणूक

योजना बंद

येथील रहिवाशांना घरकुल योजनेचा लाभ देऊन झोपडपट्टीमुक्त शहर करण्याच्या उद्देशाने भीमवाडी परिसरात घरकुल योजनेच्या सहा इमारतींना परवानगी मिळाली होती. २०१० ला इमारतीच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. २०१७ ला तयार झालेल्या दोन इमारतींचा रहिवाशांना ताबा देत सदनिकेचे वाटप झाले होते.

अन्य चार इमारती अद्यापही तयार झालेल्या नाहीत. ज्या योजनेअंतर्गत इमारती तयार केल्या जात होत्या. ती योजना बंद पडल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आल्याचे रहिवाशांनी सांगितले. यामुळे भूमिपूजन झालेल्या अन्य चार इमारत चोरीस गेल्या, असे म्हणण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे.

"भीमवाडी परिसर नेहमी विकासापासून दुर्लक्षित राहिला आहे. रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विकासाच्या नावाखाली घरकुल योजनांच्या ६ इमारतींना मंजुरी मिळाली होती. प्रत्यक्षात दोनच इमारत बघावयास मिळत आहे. अन्य चार इमारती चोरीस गेल्या असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही."- सचिन गायकवाड, स्थानिक नागरिक

The site of the stolen building.
Vegetables Rates Hike: सर्वच भाज्यांच्या दरांत मोठी वाढ! आठवडे बाजाराला उन्हाचा तडाखा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com