Nashik Rangpanchmi 2024 : रंगबिरंगी रंगांनी सजली बाजारपेठ; नैसर्गिक रंग विक्रीचा निर्धार

Rangpanchmi 2024 : रंगोत्सव साजरा करण्यासाठी लहानांपासून आबालवृद्धांमध्ये उत्साह संचारला आहे.
On the occasion of Ranga Panchami, the rush of consumers to buy various colors. A color tank that is an attraction in the market.
On the occasion of Ranga Panchami, the rush of consumers to buy various colors. A color tank that is an attraction in the market.esakal

Nashik Rangpanchmi 2024 : रंगोत्सव साजरा करण्यासाठी लहानांपासून आबालवृद्धांमध्ये उत्साह संचारला आहे. होळीच्या पाचव्या दिवशी शहरात रंगोत्सव अर्थात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर रंगांसह विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. यासह विविध प्रकारच्या पिचकाऱ्यादेखील बाजारात दाखल झाल्या आहेत. चिमुरड्यांसह तरुणाईची पावले रंग अन् पिचकाऱ्यांच्या खरेदीसाठी दुकानांकडे वळू लागली आहे. (nashik background of Rang Panchami shops selling colors are set up in city marathi news)

मोठ्या प्रमाणावर रंगांची विक्री होत असून यंदा केवळ नैसर्गिक रंग विक्रीचा निर्धार केला असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. नैसर्गिक रंगांच्या वापराने त्वचेला हानी होत नाही. त्यामुळे विक्रेत्यांकडून केमिकल रंगांऐवजी नैसर्गिक रंगांची विक्री केली जात आहे. रंग आणि पिचकाऱ्यांच्या दरात यंदा १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निरनिराळ्या साहित्य खरेदी-विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होईल, असे व्यावसायिकांनी सांगितले.

बाजारात १५० ते २५० रुपये किलोपर्यंत रंगांची विक्री केली जात आहे. लहान मुलांना आकर्षित करणारी टॅंक, एअर गन, बॅग स्टाइल, पाइप, स्मोक स्टील, बासरीच्या आकारातील, कार्टूनच्या अनेक पिचकाऱ्या तीस रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लहान मुलांना आकर्षक वाटणाऱ्या या पिचकारी खरेदी करण्याठी मुले पालकांकडे हट्ट करत असून पालक देखील मोठ्या आनंदाने आपल्या मुलांचा हट्ट पुरवीत खरेदी करत आहेत असल्याची माहिती विक्रेत्या अंजू धाईजे यांनी दिली. (latest marathi news)

On the occasion of Ranga Panchami, the rush of consumers to buy various colors. A color tank that is an attraction in the market.
Rangpanchmi 2024 : रंगोत्सवासाठी विविध मंडळाकडून जय्यत तयारी

कलर टँक ठरतेय आकर्षण

बाजार रंगांची उधळण करण्यासाठी बाजार कलर टँक दाखल झाली आहे. अग्निशमन टाकीप्रमाणे दिसणारी कलर टँक बाजारात सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यात विविध कलर भरून ते स्प्रे करता येतात व टँक रिकामी झाल्यास त्यात रंग भरून पुन्हा वापरात आणता येते. बाजार एक हजार ते पंधराशे रुपयांपर्यंत या टँकची विक्री होत असून विशेषतः तरुणांकडून टँकची खरेदी केली जात असल्याची माहिती विक्रेते सागर धाईजे यांनी दिली.

''रंगपंचमीसाठी नैसर्गिक रंगांचीच विक्री करत आहोत. विविध आकाराच्या पिचकारी लहान मुलांसह तरुणदेखील उत्साहाने खरेदी करत आहे. यंदा रंगपंचमीला बाजारात उत्साह आहे.''- सागर धाईजे, विक्रेता.

On the occasion of Ranga Panchami, the rush of consumers to buy various colors. A color tank that is an attraction in the market.
Nashik Lok Sabha Election 2024: साडेतीनविरुद्ध अडीच मतदारसंघांची लढाई! शहरी मतदारांचा प्रभाव अधिक, ग्रामीण भागाचा पगडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com