Nashik News : नाशिकचे भगर उत्पादक छोरिया यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

felicitation

Nashik News : नाशिकचे भगर उत्पादक छोरिया यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

नाशिक : शासनाच्या कृषी विभागामार्फत पौष्टिक तृणधान्य प्रक्रिया उद्योगात उल्लेखनीय कामगिरी केल्याबददल नाशिकचे भगर उत्पादक व ‘सोनपरी’ भगरीचे निर्माते महेंद्र छोरिया यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी ‘रेडू टू कूक भगर सेहतचेही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ‘रेडू टू कूक भगर’ ही राज्यातील नव्हे तर देशातील पहिली भगर असणार आहे. त्यामुळे नाशिकच्या नावलौकिकामध्ये आणखी एक भर पडली आहे. (Nashik bhagar producer mahendra Choria honored by CM Eknath Shinde Nashik News)

मुंबई येथे मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती होती.

नाशिकचे भगर उत्पादन महेंद्र छोरिया यांनी ‘सोनपरी’ भगर उत्पादनाच्या माध्यमातून भगरीला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविले आहे. २०२३ हे वर्ष राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर तृणधान्य वर्ष म्हणून साजरे होत आहे.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

त्यापाश्‍र्वभूमीवर कृषी विभागामार्फत तृणधान्य प्रक्रिया उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या २० उद्योजक व शेतकऱ्यांचा सन्मान यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यावेळी केंद्र शासन व राज्यशासनाच्या तृणधान्य वर्ष २०२३ च्या समितीवर सदस्य असलेले छोरिया यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच, यावेळी सोनपरीच्या ‘रेडू टू कूक भगर’ या सेहतचेही अनावरण यावेळी करण्यात आले. यावेळी पंकज छोरिया, कीर्ती छोरिया यांचीही उपस्थिती होती.

टॅग्स :CM Eknath ShindeNashik