Arnav Tambat and Venkatesh Behre
Arnav Tambat and Venkatesh Behreesakal

State Level Cricket Tournament : नाशिकचा हिंगोलीवर मोठा विजय; राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा

State Level Cricket Tournament : नाशिक मध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १६ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात नाशिकने हिंगोली वर एक डाव व १६१ धावांनी मोठा विजय मिळवला. अर्णव तांबटने अष्टपैलू तर व्यंकटेश बेहरेने गोलंदाजीत चमक दाखवली.

एस एस के मैदानावर प्रथम फलंदाजी मिळालेल्या नाशिकने ७१.२ षटकांत ९ बाद ३२६ धावा केल्या. सलामीवीर अर्णव तांबटने ९१ व ध्रुव एखंडेने ५९ धावा केल्या. ज्ञानदीप गवळीने ५० व अथर्व सूर्यवंशीने ४६ धावा केल्या.

ओमकार वाघने ५ बळी घेतले. उत्तरादाखल व्यंकटेश बेहरेच्या ६ बळी घेणाऱ्या जोरदार गोलंदाजीच्या बळावर हिंगोलीला सर्व बाद ८६ च धावा करता आल्या. कौस्तुभ रेवगडेने २ तर सिद्धेश चव्हाण व नील चंद्रात्रेने प्रत्येकी १ गडी बाद केला.

फॉलो ऑन नंतर दुसऱ्या डावात देखील अर्णव तांबटच्या ४ व सिद्धेश चव्हाणच्या ३ बळींच्या जोरावर हिंगोलीला सर्व बाद ८४ इतकीच मजल मारता आली. अथर्व सूर्यवंशीने २ व व्यंकटेश बेहरेनेहि १ गडी बाद करत नाशिकला मोठा विजय मिळवून दिला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Arnav Tambat and Venkatesh Behre
IPL : यशस्वी, रिंकूची वर्ल्डकपसाठी दावेवारी

इतर दोन सामन्यांत महात्मा नगर क्रिकेट मैदानावर जालनाने ज्युडिशियल विरुद्ध एक डाव व ३७ धावांनी मोठा विजय मिळवला.

( संक्षिप्त धावफलक : जालना पहिला डाव २७५ - शौर्य जयस्वाल १५२ वि ज्युडिशियल पहिला डाव १११ - अनुराग बन ५ बळी व फॉलोऑन नंतर दुसरा डाव १२७ - आर्यन वाकडे ६ बळी )

तर एम सी सी मैदानावर स्पोर्टसमनने सी एन ए, विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले . ( संक्षिप्त धावफलक : स्पोर्टसमन पहिला डाव २४६ व दुसरा डाव ५ बाद ७५ सी एन ए पहिला डाव १७७ ).

Arnav Tambat and Venkatesh Behre
RCB IPL 2023: RCB च्या विजयाने Playoffs चं गणित बिघडलं; रोहितसमोर 'विराट' संकट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com