

Nashik BJP Workers Oppose New Political Inductions
Esakal
पक्षाच्या महिला आमदाराचा विरोध असतानाही भाजपने नाशिकमध्ये पाच जणांना पक्षात प्रवेश दिला. यात मनसेच्या माजी आमदाराचाही समावेश आहे. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. ठाकरे गटाच्या नेत्यांसह मनसेचे माजी आमदार आणि माजी महापौरांचा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. या प्रवेशाला भाजपच्या महिला आमदार देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केला. पण या विरोधाला न जुमानता प्रवेश सोहळा झाल्यानं आता पुढे काय होणार याकडं लक्ष लागन राहिलं आहे. स्थानिक भाजप नेत्यांनी या प्रवेशाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती.