Nashik : नेत्रविकारावरील प्रभावी उपचारांवर मंथन

तीन दिवसीय मॉसकॉनमध्ये परिषदेचा समारोप, समिती सदस्‍यांचा सत्‍कार
Nashik eye health news
Nashik eye health newsesakal

नाशिक : नेत्रविकार व त्‍यावरील प्रभावी व आधुनिक उपचारांबाबतची माहिती १०६ शास्‍त्रीय सत्रांच्‍या माध्यमातून देण्यात आली. डोळ्यांच्‍या शस्‍त्रक्रियांच्‍या प्रक्षेपणातून डॉक्‍टरांना मार्गदर्शन उपलब्‍ध करून दिले. गेल्‍या तीन दिवसांत या विविध सत्रांनंतर रविवारी (ता.१६) नेत्ररोग तज्‍ज्ञांच्‍या ''मॉसकॉन 2022'' या राज्‍यस्‍तरीय परिषदेचा समारोप झाला. परिषद आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या विविध समित्‍यांतील सदस्‍यांचा मान्‍यवराच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्यात आला.

Nashik eye health news
Nashik : महापालिका शाळा परिसरात कचऱ्याचे ढीग

महाराष्ट्र नेत्रतज्ज्ञ संघटना आणि नाशिक नेत्रतज्ज्ञ संघटनेतर्फे हॉटेल ताज गेटवे येथे ही परिषद झाली. समारोपप्रसंगी डॉ. तात्‍याराव लहाने, महाराष्ट्र नेत्रतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. संतोष भिडे, सचिव डॉ. अनघा हेरूर, माजी अध्यक्ष डॉ. जिग्नेश तासवाला, डॉ. रागिणी पारेख, डॉ. वर्धमान कांकरिया, मॉसकॉन २०२२ परिषदेचे अध्यक्ष डॉ. सतीश पाटील, आयोजन सचिव डॉ. नानासाहेब खरे, खजिनदार डॉ. सचिन कोरडे, नाशिक नेत्रतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. विवेक कोठावदे आदी उपस्‍थित होते. या तीन दिवसीय परिषदेत राज्‍यभरातून सुमारे सोळाशे डॉक्‍टरांनी सहभाग नोंदविल्‍याचे आयोजकांनी सांगितले.

Nashik eye health news
Nashik : संगणकाच्या युगात रोजनिशीचे महत्त्व कायम

परिषदेचा आढावा घेतांना डॉ. भिडे म्‍हणाले, पावसाच्‍या शक्‍यतेमुळे परिषदेबाबत अनिश्‍चितता होती, परंतु नाशिक संघटनेने उत्‍कृष्ट नियोजन करताना परिषद यशस्‍वी केली. शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण दाखवतांना सहभागी डॉक्‍टरांना अद्ययावत ज्ञान मिळवून दिल्‍याबद्दल समाधान व्‍यक्‍त केले. डॉ. तासवाला म्‍हणाले, परिषदेत नाविन्‍यता राखत नेत्रविकार क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान तसेच मनोरंजकात्‍मक कार्यक्रम दर्जेदार होते.

Nashik eye health news
Nashik Crime News : 2 कारमधून अवैध मद्याची वाहतूक

डॉ. लहाने म्‍हणाले, की परिषदेच्‍या यशस्‍वी आयोजनाबद्दल प्रत्‍येक समितीच्‍या सदस्‍यांचे अभिनंदन आहे. अशाच स्‍वरुपाच्‍या परिषदांतून ज्ञानाचे आदानप्रदान होत राहावे. डॉ. नानासाहेन खरे म्‍हणाले, की परिषदेत सहभागींनी अनुभवलेले, मंतरलेले दिवस प्रत्‍येकाला आयुष्यभर स्‍मरणात राहतील. सांघिक परिश्रमातून राज्यस्तरीय परिषद यशस्‍वी करता आली. डॉ. सनय महाजन यांनी समारोपाचे सूत्रसंचालन केले. नेत्र परिषद यशस्वीतेसाठी विविध समिती सदस्‍यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com