CET Exam : CET तारखांमध्ये निवडणुकांमुळे बदल; एप्रिल-मे मधील परीक्षांचा समावेश

CET Exam : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, यादरम्‍यान येणाऱ्या परीक्षांच्‍या वेळापत्रकांमध्ये बदल केले जात आहेत.
CET Exam
CET Exam esakal

CET Exam : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, यादरम्‍यान येणाऱ्या परीक्षांच्‍या वेळापत्रकांमध्ये बदल केले जात आहेत. त्यात राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे वेगवेगळ्या व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या ‘सीईटी’च्‍या तारखांमध्ये बदल केला असून, सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. एप्रिल-मेमधील या सीईटी परीक्षांमध्ये बदल केला आहे. (Nashik CET Exam included in April May due to lok sabha election marathi news)

यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा तसेच सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्‍या परीक्षांच्‍या तारखांमध्ये बदल केला होता. या पार्श्वभूमीवर राज्‍यस्‍तरावरील सीईटी परीक्षांच्‍या तारखांमध्येही बदल केला आहे. सीईटी सेलने सूचनापत्र जारी करताना सुधारित वेळापत्रकाची घोषणा केली आहे. यामध्ये निवडणुकीच्‍या तारखा वगळल्‍या आहेत. (latest marathi news)

CET Exam
CET Exam : व्‍यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी परीक्षा सक्‍तीची

सुधारित तारखा अशा :

* एमएचटी-सीईटी- पीसीबी ग्रुप ः २२, २३, २४, २८, २९, ३० एप्रिल

* एमएचटी-सीईटी- पीसीएम ग्रुप ः २, ३, ४, ५, ९, १०, ११, १५, १६ मे

* आर्किटेक्‍ट सीईटी- १२ मे

* बीए-बीएस्सी बी.एड.- १७ मे

* एलएलबी (५ वर्षे)- १७ मे

* नर्सिंग- १८ मे

* हॉटेल मॅनेजमेंट (पदवी)- २२ मे

* बीबीए-बीसीए- २७ ते २९ मे

CET Exam
CET Exam : बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम परिक्षांना आता सीईटी बंधनकारक...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com