Chandrakant Patil : सुधरा, अन्यथा महाविद्यालय बंद करा! मंत्री पाटील

Chandrakant Patil : स्‍वायत्त महाविद्यालय, पदव्‍युत्तर अभ्यासक्रमांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यशस्‍वी झाली आहे.
Higher and Technical Education Minister Chandrakantada Patil while guiding a workshop organized by Maratha Vidyaprasarak Samas Sanstha and Board of Indian Education, West Maharashtra Province on Saturday. Neighbor Steering Committee Member Mahesh Dabak, General Secretary of MVP Association Adv. Office bearers of various organizations along with Nitin Thackeray.
Higher and Technical Education Minister Chandrakantada Patil while guiding a workshop organized by Maratha Vidyaprasarak Samas Sanstha and Board of Indian Education, West Maharashtra Province on Saturday. Neighbor Steering Committee Member Mahesh Dabak, General Secretary of MVP Association Adv. Office bearers of various organizations along with Nitin Thackeray.esakal
Updated on

Chandrakant Patil : स्‍वायत्त महाविद्यालय, पदव्‍युत्तर अभ्यासक्रमांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यशस्‍वी झाली आहे. येत्‍या जूनपासून धोरणाची अंमलबजावणी न करणारे महाविद्यालये, विद्यापीठांची संलग्‍नता काढली जाईल. बदलत्‍या काळात रोजगारक्षम अभ्यासक्रमांची आवश्‍यकता असून, विद्यार्थ्यांनी मुंबई, पुण्याकडे धाव घेण्याऐवजी गावात राहून शिक्षण घ्यावे, असे वाटत असल्‍यास शैक्षणिक धोरण स्‍वीकारल्‍याशिवाय पर्याय नाही. (nashik Chandrakant Patil statement college marathi news)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्‍या अंमलबजावणीला पर्याय नसून ‘सुधरा, नाहीतर महाविद्यालय बंद करा’ असा सज्‍जड इशारा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी (ता. २) दिला. गंगापूर रोडवरील कर्मवीर ॲड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील सभागृहात मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍था आणि भारतीय शिक्षण मंडळ, पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत यांच्‍यातर्फे आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आनंदशाळेच्‍या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी सुकाणू समिती सदस्‍य महेश दाबक, राजेश पांडे, मविप्र संस्‍थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांच्‍यासह विविध शैक्षणिक संस्‍थांचे पदाधिकारी उपस्‍थित होते. मंत्री श्री. पाटील म्‍हणाले, की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत बागूलबुवा केला गेला आहे. केंद्राच्‍या धोरणाविरुद्ध भूमिका घेण्याचा निर्धार केलेल्‍या राज्‍यातील तत्‍कालीन ३३ महिन्‍यांच्‍या महाविकास आघाडीच्‍या सरकारमुळे धोरणाच्‍या अंमलबजावणीस विलंब झाला.

त्‍यामुळे आता वेगाने अंमलबजावणी करावी लागणार आहे. शैक्षणिक धोरण स्‍वीकारणार नाही, अशा महाविद्यालयांनी परदेशातील विद्यापीठाची संलग्‍नता घेण्यासाठी तयार राहावे, असेही त्‍यांनी स्‍पष्ट केले. महेश दाबक म्‍हणाले, की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्‍या अंमलबजावणीत देशात महाराष्ट्र राज्‍य पहिल्‍या क्रमांकावर आहे. (latest marathi news)

Higher and Technical Education Minister Chandrakantada Patil while guiding a workshop organized by Maratha Vidyaprasarak Samas Sanstha and Board of Indian Education, West Maharashtra Province on Saturday. Neighbor Steering Committee Member Mahesh Dabak, General Secretary of MVP Association Adv. Office bearers of various organizations along with Nitin Thackeray.
Chandrakant Dada Patil : राज्यात चाललंय ते अनाकलनीय : चंद्रकांत पाटील

आनंदशाळेतून संस्‍थाचालक, प्राचार्य यांसह शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांमध्ये चर्चा घडविली जात आहे. या कार्यशाळेतील चर्चेचा सविस्‍तर अहवाल मंत्री महोदयांना सादर केला जाईल. ॲड. नितीन ठाकरे प्रास्‍ताविकात म्‍हणाले, की शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटकांना मार्गदर्शन मिळण्याच्‍या उद्देशाने कार्यशाळा आयोजित केलेली आहे. या माध्यमातून तज्‍ज्ञांचे मार्गदर्शन प्राप्त होऊन शंकांचे निरसन होईल, अशी यामागील भूमिका आहे. प्रा. डॉ. तुषार पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

विनाचालकाची गाडी नकोच

राजकारणात सध्या चालकच नसलेल्‍या गाडीत बसण्यासाठी प्रयत्‍न सुरू असल्‍याची मिश्‍कील टीका ‘इंडिया’ आघाडीचे नाव न घेता मंत्री पाटील यांनी केली. अशी अवस्‍था आपल्‍या संस्‍था, महाविद्यालयाची होऊ द्यायची नसेल तर धोरणाचा स्‍वीकार करण्याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

प्राध्यापकांनी शिकत राहावे

शैक्षणिक धोरणाच्‍या अंमलबजावणीत कुठल्‍याही प्राध्यापकांचे इतर ठिकाणी समायोजन केले जाणार नाही. पण अतिरिक्‍त ठरणाऱ्या प्राध्यापकांनी धोरणाला अनुसरून अभ्यासक्रमात बदल करत विविध कौशल्‍याधिष्ठित विषय आत्‍मसात करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे अपेक्षित असल्‍याचे मंत्री पाटील यांनी नमूद केले.

Higher and Technical Education Minister Chandrakantada Patil while guiding a workshop organized by Maratha Vidyaprasarak Samas Sanstha and Board of Indian Education, West Maharashtra Province on Saturday. Neighbor Steering Committee Member Mahesh Dabak, General Secretary of MVP Association Adv. Office bearers of various organizations along with Nitin Thackeray.
Chandrakant Patil: राज्याला शैक्षणिकदृष्ट्या पुढे नेणारा 'पाटील पॅटर्न'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com