Nashik News : गणेशाने ओढल्या बारागाड्या; सातपूरला शेकडो वर्षांची यात्रा परंपरा कायम

Nashik : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सातपूरच्या भवानी माता यात्रेत मंगळवारी (ता.९) सायंकाळी अर्धनारी नटेश्वर श्री गणेशाने बारा गाड्या ओढल्या.
Ganesha pulling twelve chariots in Bhavani Mata Yatrosva
Ganesha pulling twelve chariots in Bhavani Mata Yatrosvaesakal

Nashik News : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सातपूरच्या भवानी माता यात्रेत मंगळवारी (ता.९) सायंकाळी अर्धनारी नटेश्वर श्री गणेशाने बारा गाड्या ओढल्या. दरवर्षी गुढीपाढव्याला सातपूर येथील भवानी मातेच्या यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे. अर्धनारी नटेश्वर वेशभूषेत श्री गणेशा कृष्णा निगळ याने गावातील वेशीवर असलेल्या मारुती मंदिर, वेताळबाबा मंदिर व औद्योगिक वसाहतीतील पुरातन भवानी माता मंदिरात पूजन करून सातपूर गावातील त्र्यंबक रोडवर एकमेकाला बांधलेल्या बारा गाड्या ओढल्या.(Nashik Chariot pulled by Ganesha in satpur tradition of hundred years marathi News )

बारागाड्या ओढल्यानंतर श्री गणेशाची सातपूर गावातून सवाद्य मिरवणुकीत काढली. यात्रेला प्रमुख पाहूणे म्हणून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, मा. खा. हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, मा. आ. राजाभाऊ वाजे, कामगार नेते डॉ. डी. एल. कराड, माजी महापौर दशरथ पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी नगरसेवक दिनकर पाटील, रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आदींसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. (latest marathi news)

Ganesha pulling twelve chariots in Bhavani Mata Yatrosva
Nashik News : नूतनीकरणानंतरही महात्मा फुले कलादालन बंदच! कलावंतांना फायदा ना महापालिकेला

यात्रेसाठी समितीच्या शांताराम निगळ, गोकुळ निगळ, यात्रा उत्सव समिती अध्यक्ष गोकुळ निगळ, उपाध्यक्ष दादा निगळ, दिलीप भंदुरे, कार्याध्यक्ष सुनील मौले, शिवाजी मटाले, तर सचिव के. के. काळे आदींसह यात्रा कमिटीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पोलिसांचे सुयोग्य नियोजन असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

Ganesha pulling twelve chariots in Bhavani Mata Yatrosva
Nashik News : अभिनेते गोविंदा त्र्यंबकराजाच्या चरणी लीन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com