Nashik Summer News: इगतपुरी तालुक्यात उष्णतेमुळे नागरिक हैराण! मुंबई - आग्रा महामार्गावरील वाहतूकही मंदावली

Nashik News : या स्थितीत शहर व तालुक्यात सातत्याने अघोषित भारनियमनाचे चटके बसत आहे. यामुळे वाढत्या उकाड्याला तोंड देताना नागरीक त्रस्त झाले आहे.
Traffic on the busiest Mumbai-Agra highway was also slowed down due to the hot sun.
Traffic on the busiest Mumbai-Agra highway was also slowed down due to the hot sun.esakal

इगतपुरी : थंड हवेचे ठिकाण आणि पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात यंदाच्या हंगामातील उष्णतेचा उच्चांक गाठल्यानंतर मागील आठवड्यापासून तापमानाच्या शृंखलेत काहीसे चढ-उतार होत असले तरी कडक उन्हामुळे आठवठे बाजारासह जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. या स्थितीत शहर व तालुक्यात सातत्याने अघोषित भारनियमनाचे चटके बसत आहे. यामुळे वाढत्या उकाड्याला तोंड देताना नागरीक त्रस्त झाले आहे. (Nashik Citizens shocked due to heat in Igatpuri taluka news)

थंड हवेसाठी प्रसिद्ध इगतपुरीमध्ये मार्चच्या शेवटी व एप्रिलच्या सुरुवातीलाच कडक उन व त्याची दाहकता अधिकच वाढली आहे. मार्च महिन्यात ३४ ते ३५ अंशांच्या आसपास राहिलेल्या तापमानाने आता उसळी घेतली असून, याचा आलेख येत्या काही दिवसात अधिक उंचावण्याची धास्ती मात्र कायम आहे. मागील आठवड्यापासून पारा चढताच राहिला आहे.

त्यामुळे तीव्र उष्णता, उकाडा व अंगाची काहीली कायम राहिल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळ नऊपासून ते सूर्योदयापर्यंत उन्हाचे चटके बसतात. त्यामुळे बहुतांश नागरिक दुपारी घराबाहेर जाणे टाळत आहेत. या काळात प्रमुख बाजारपेठा, रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचे दिसून येते. परिणामी, बाजारपेठांमधील व्यवहार थंडावलेले आहेत. शासकीय कार्यालयांतील कामकाजातसुद्धा संथपणा आलेला आहे.

Traffic on the busiest Mumbai-Agra highway was also slowed down due to the hot sun.
Heat Stroke : उष्माघाताने तरुणाचा मृत्यू; उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापुर्वीच मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ

रस्त्यांवर शुकशुकाट

अलिकडेच सिन्नर पट्टा व आसपासच्या काही भागात तुरळक पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे उष्मा अधिकच वाढला. सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत सूर्याचा प्रकोप कायम राहतो. ग्रामीण भागात गर्दीच्या ठिकाणी, रस्त्यांवर शुकशुकाट असतो. मुंबई - आग्रा महामार्गावरील वाहतुकीवरही तापमानाचा मोठा परिणाम झाला असून, तुरळक वर्दळ दिसून येत आहे.

महावितरणकडून भारनियमनाचे चटके

तालुक्यात कोणत्याही भागात कोणत्याही वेळी वीजपुरवठा खंडित होतो. या घटनाक्रमाने छुप्या मार्गाने भारनियमन होत असल्याची साशंकता व्यक्त होत आहे. सायंकाळी गर्दीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापारीवर्गात संताप आहे.

यासंदर्भात विचारणा केल्यावर महावितरण स्थानिक बिघाडाचे कारण पुढे करते. तांत्रिक समस्या उद्भवल्याने काही भागांत वीजपुरवठा खंडित होतो. एखाद्या भागात अर्धातास वीज गेली असल्यास ‘फ्यूज’ उडणे वा तत्सम बिघाड असू शकतो, असे सांगितले जाते.

Traffic on the busiest Mumbai-Agra highway was also slowed down due to the hot sun.
Summer Tips : उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांना उष्माघाताचा धोका; उकाड्यापासून बचावासाठी काय घ्यावी काळजी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com