esakal | नाशिकचा पारा घसरला..! कोरोना संसर्गाची घ्यावी लागणार काळजी 
sakal

बोलून बातमी शोधा

nifad cold.jpg

नाशिकचा पारा घसरल्याने हुडहुडी भरली आहे. दिवाळीपूर्वी दहा अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेला पारा २० अंश सेल्सिअसपर्यंत पोचला होता. दिवाळीनंतर हळूहळू किमान तापमानात घट होऊ लागली आहे

नाशिकचा पारा घसरला..! कोरोना संसर्गाची घ्यावी लागणार काळजी 

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : नाशिकचा पारा घसरल्याने हुडहुडी भरली आहे. दिवाळीपूर्वी दहा अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेला पारा २० अंश सेल्सिअसपर्यंत पोचला होता. दिवाळीनंतर हळूहळू किमान तापमानात घट होऊ लागली आहे

कोरोना संसर्गाची घ्यावी लागणार काळजी 

 गुरुवारी (ता.२६) १४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. १५ अंश सेल्सिअस खाली पारा घसरल्यानंतर कोरोना विषाणू संसर्गाची काळजी घेणे आवश्‍यक बनले आहे. पारा घसरल्याने हुडहुडी भरली आहे. सध्याच्या किमान आणि कमाल तापमानातील घसरणीमुळे सर्दी, खोकला, ताप अशा आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे गरम आहार घेत, गरम पाणी प्यावे, ऊबदार कपडे घालावेत, अनावश्‍यक घराबाहेर पडू नये, असा सल्ला वैद्यकीयतज्ज्ञ देत आहेत.

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

दरम्यान, गुरुवारी राज्यात सर्वांत कमी किमान १३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद गोंदियामध्ये झाली. महाबळेश्‍वरमधील गारठा वाढत असून, १३.९ अंश सेल्सिअस किमान तापमान राहिले. पुण्यात १३.३, जळगावमध्ये १४.६, मालेगावमध्ये १६.२, सातारामध्ये १४, मुंबईत २२, अमरावतीत १३.३ अंश सेल्सिअस तापमान राहिले.  

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ


 

loading image
go to top