esakal | नाशिकला 120 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता - जिल्हाधिकारी

बोलून बातमी शोधा

collector mandhre

नाशिकला 120 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता - जिल्हाधिकारी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नाशिक : ऑक्सिजन आणीबाणी संदर्भातली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. नाशिकला 120 मेट्रिक टनची आवश्यकता आहे. सध्या स्थितीत नाशिकमध्ये 103 मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर होत असून ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. सध्या ऑक्सिजनचा व्यवस्थित वापर करण्याची गरज आहे. दरम्यान ऑक्सिजनचा वापर तिप्पट चौपट वाढला असून ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. असे नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा: Breaking : धक्कादायक! नाशिक शहरातील 5 हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा

औरंगाबादमधून नाशिकला मिळणार ऑक्सिजनचा पुरवठा

औरंगाबादमधून नाशिकला मिळणार ऑक्सिजनचा पुरवठा होणार असून संकट सर्वांसमोरच आहे. रुग्णालयांनी ऑक्सिजन सनियंत्रण वापरण्याची गरज आहे. काही रुग्णायलयांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ऑक्सिजनचा साठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न असून ऑक्सिजनचा वापर सनियंत्रित करण्याची गरज आहे. औद्योगिक वसाहतींचा ऑक्सिजन वापर पूर्णपणे थांबवलाय. हॉस्पिटलनेही ऑक्सिजन वापराबाबत काळजी घेण्याची शक्यता आहे. बऱ्याच हॉस्पिटलकडून ऑक्सिजनचा नियमाप्रमाणे वापर होत नाही असे दिसून आले.

हेही वाचा: नाशिकच्या सिक्स सिग्मा हॉस्पिटलमधील परिस्थिती चिंताजनक; पाहा VIDEO