esakal | नाशिक जिल्ह्यात जुलैमध्ये तिसऱ्यांदा आढळले शंभरपेक्षा कमी बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update

जिल्ह्यात जुलैमध्ये तिसऱ्यांदा आढळले शंभरपेक्षा कमी बाधित

sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाच्या नियंत्रणाबाबत समाधानकारक स्‍थिती आहे. जुलैमध्ये तिसऱ्यांदा दैनंदिन आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या शंभरपेक्षा कमी राहिली. गुरुवारी (ता.२२) जिल्ह्यात ८९ पॉझिटिव्‍ह आढळले. तर १०४ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. तीन बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत अठराने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात एक हजार ४२८ बाधित उपचार घेत आहेत. (89 corona positive patients reported in district today)

यापूर्वी १२ व २० जुलैला शंभरापेक्षा कमी कोरोनाबाधित आढळले होते. गुरुवारी (ता.२२) नाशिक महापालिका क्षेत्रात अवघ्या १६ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. नाशिक ग्रामीणमध्ये ७०, तर मालेगाव महापालिका क्षेत्रात तीन रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. जिल्ह्यात नोंदविलेल्‍या तीन मृतांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील दोन, तर नाशिक ग्रामीण क्षेत्रातील एका बाधिताचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे.

हेही वाचा: इगतपुरी पूर्व भागात चार दिवसांपासून वीज खंडित

प्रलंबित अहवालांची संख्या दोन हजारांच्‍या घरात पोचली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ९९७ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. नाशिक ग्रामीण क्षेत्रात एक हजार ३१५, मालेगाव महापालिका क्षेत्रातील ३४५, तर नाशिक महापालिका क्षेत्रातील ३३७ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा कायम होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३५५ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ३२४ रुग्‍णांचा समावेश होता. जिल्‍हा रुग्‍णालय व डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्‍येकी दोन रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीण क्षेत्रात पंधरा, मालेगाव महापालिका क्षेत्रात बारा रुग्‍ण दाखल झाले.

(89 corona positive patients reported in district today)

हेही वाचा: नाशिक : अखेर 'तो' बहुचर्चित आंतरधर्मिय विवाह संपन्न

loading image