Nashik Corona Updates | ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्यापुन्‍हा पाचशेच्‍या उंबरठ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona-covid19

Nashik | ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्यापुन्‍हा पाचशेच्‍या उंबरठ्यावर

नाशिक : गेल्‍या तीन-चार दिवसांपासून नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना (Corona) बाधितांच्‍या तुलनेत कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्या कमी राहते आहे. त्‍यामूळे ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्या पुन्‍हा वाढत असतांना, पाचशेच्‍या उंबरठ्यावर येऊन पोहचली आहे. रविवारी (ता.२१) जिल्‍ह्‍यात ५२ रुग्‍णांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर ३६ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. दोन बाधितांच्‍या मृत्‍यूची नोंद आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात ४८८ बाधितांवर उपचार सुरु आहेत.

कोरोना प्रादुर्भावाच्‍या दृष्टीने काहीशी दिलासादायक स्‍थिती राहत असतांना, आता परीस्‍थितीत पुन्‍हा बदल होऊ लागला आहे. दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या पन्नासाहून अधिक राहते आहे. रविवारी नाशिक शहरातील ३२, नाशिक ग्रामीणमधील १८, तर जिल्‍हा बाहेरील दोन रुग्‍णांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले आहे. दोन बाधितांच्‍या मृत्‍यूची नोंद असून, दोघे मृत हे नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत.

हेही वाचा: Nashik | सोनसाखळी चोरट्यांसह सराफ व्‍यावसायिक गजाआड

प्रलंबित अहवालांची संख्या घटली असून, सायंकाळी उशीरापर्यंत २६१ अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक शहरातील १४८, नाशिक ग्रामीणमधील १०९ तर मालेगावच्‍या चौघांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ७३२ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी ७२६ रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. दीर्घ कालावधीनंतर डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात रुग्‍ण दाखल झाले. या ठिकाणी दोन रुग्‍ण दाखल करण्यात आल्‍याची नोंद आहे. उर्वरित चार संशयित नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत.

हेही वाचा: रस्ता आंदोलनाची नौटंकी भाजपने बंद करावी

loading image
go to top