Nashik Crime: चैन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीचा सिन्नर पोलिसांकडून पर्दाफाश! जबरी चोरीसह चोरीचे 4 गुन्हे उघडकीस

Crime News : नाशिक रोड भागातील गोसावी वाडीतील छग्या ऊर्फ ओमकार रमेश काळे (वय १९) याने साथीदारांच्या मदतीने नगर जिल्ह्यात व सिन्नर तालुक्यात चैन स्नॅचिंग केल्या होत्या.
Police inspector Sambhaji Gaikwad and team with the suspect in the chain snatching case.
Police inspector Sambhaji Gaikwad and team with the suspect in the chain snatching case.esakal

सिन्नर : नाशिक रोड भागातील गोसावी वाडीतील छग्या ऊर्फ ओमकार रमेश काळे (वय १९) याने साथीदारांच्या मदतीने नगर जिल्ह्यात व सिन्नर तालुक्यात चैन स्नॅचिंग केल्या होत्या. या प्रकरणी सिन्नर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. (Nashik Crime Chain snatching gang busted by Sinner Police marathi news)

दरम्यान. पोलिस पथक त्याच्या मागावर होते. मात्र, तो वारंवार पोलिसांना चकवा देवून पळून जात होता. पोलिसांनी पाळत ठेवून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने सिन्नर तालुक्यात चैन स्नॅचिंगचे ३ गुन्हे, वडाळा महादेव (ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर) एकाच्या मदतीने केल्याची कबुली दिली. त्यावरून त्या संशयिताचा शोध घेत असताना, तो विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याचे निष्पन्न झाले.

त्यास त्याच्या पालकांसमक्ष ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्याने काळे व मोहित याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ९९ हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने व २५ हजारांची रोकड, एकूण एक लाख २४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांच्याकडून अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

Police inspector Sambhaji Gaikwad and team with the suspect in the chain snatching case.
Nagpur Crime: मिनी बॉम्ब प्रकरणातील आरोपीचा जामीन रद्द; पोलिसांचे प्रयत्न झाले सफल, आरोपी अटकेत

ही कारवाई पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपअधीक्षक डॉ. नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नरचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, उपनिरीक्षक हनुमान उगले, अजिनाथ कोठाळे, हवालदार नवनाथ पवार, समाधान बोराडे, हेमंत तांबडे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, तांत्रिक विश्लेषण शाखेचे प्रदीप बहीरम, हेमंत गिलबिले यांनी केली आहे.

Police inspector Sambhaji Gaikwad and team with the suspect in the chain snatching case.
Hingoli Crime News : अवैध वाळूप्रकरणी एका महिन्यात ३८ गुन्हे दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com