Nashik Fraud Crime: मालेगाव येथे वनविभागाच्या कामांमध्ये 100 कोटींचा गैरव्यवहार! SIT चौकशीसाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Crime News : समितीने या प्रकरणाची विशेष तपास पथकातर्फे (एसआयटी) चौकशीची मागणी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Fraud Crime
Fraud Crimeesakal

मालेगाव : वन विभागाच्या मालेगाव, ताहराबाद, सटाणा, नामपूर परिक्षेत्रात विविध कामांसाठी दशकात तीनशे कोटी रुपये खर्च झाले. तरीदेखील वन्यजीवांना सुरक्षित अधिवास नाही. प्रती वर्षी ८ ते १० कोटी रुपयांचा निधी वृक्ष लागवड, जाळरेषा, बुरूज दुरूस्ती, हद्द दुरूस्ती, नैसर्गिक पुनरुत्पत्ती, कट बॅक ऑपरेशन तसेच वन बंधारे, सीएनबी, सीसीटी वगैरे जलसंधारणाच्या कामांवर खर्च झाला असून यात शंभर कोटीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने केला आहे. (Nashik Crime Malpractice of 100 crores in forest department works in Malegaon marathi news)

समितीने या प्रकरणाची विशेष तपास पथकातर्फे (एसआयटी) चौकशीची मागणी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज्यपाल रमेश बैस यांना निवेदनाची प्रत पाठविण्यात आली. ३ मार्चला जागतिक वन्यजीव दिवस साजरा झाला.

या विभागात कोट्यवधी रुपये खर्च होऊनही वन जमिनीवर अतिक्रमण, वणवे पेटून वन्य जीवांचा बळी गेला. दशकात परिक्षेत्रात २५० वनतळे व काही सीएनबी बंधारे बांधली. वनतळ्यावर तीन लाख रुपये, प्रती सीएनबीवर दहा लाखापर्यंत खर्च झाला.

लाखो रनिंग मीटर सलग समतल चर खोदतांना प्रती मीटरप्रमाणे ८० ते १०० रुपये खर्च झाला. बहुतेक कामे नेत्यांच्या मर्जीतील ठेकेदारांना दिली. वृक्ष लागवड योजनेत परिक्षेत्रात १५ लाख रोपांची सरासरी लागवड झाली. १० टक्के रोपेही जिवंत नाहीत. रोपांना पाणी, निंदणी, लागवड ही कामे सुरळीत झाली नाही. (Latest Marathi News)

Fraud Crime
Jharkhand Crime : ऑर्केस्ट्रा कलाकारावर झारखंडमध्ये बलात्कार

पाणवठे नियमित भरले नसल्याने वन्य प्राणी नागरी वस्तीकडे धाव घेत आहेत. वन विभागातील गैरव्यवहारा संदर्भात आवाज उठविणाऱ्याला दमदाटी होते. शासन निधीचा दुरुपयोग होत आहे. बहुसंख्य कर्मचारी सातत्याने एकाच विभागात कार्यरत आहेत. पदासाठी बोली लागते. अवैध मुरूम उत्खनन राजरोस सुरू आहे.

या सर्व प्रकारांची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शिष्टमंडळात निखिल पवार, रामदास बोरसे, विवेक वारुळे, दीपक पाटील, प्रवीण चौधरी, सोहेल डालरिया, खुर्शीद अन्सारी, सुशांत कुलकर्णी, गोपाळ सोनवणे, मोहन कांबळे, अनिल पाटील आदींचा समावेश होता.

Fraud Crime
Nanded News : पत्रकारावर हल्ला करणाऱ्यांचा मराठी पत्रकार संघटनेतर्फे निषेध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com