Nashik Crime: सिन्नर येथे महावितरण अभियंत्यास शिवीगाळ अन् मारहाण

Crime News : महावितरणच्या भरारी पथकातील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास शिवीगाळ व मारहाण (Beating) केल्याचा प्रकार सिन्नर येथे घडला आहे.
Crime News
Crime Newsesakal

वावी : दुकानातील वीज चोरी पकडल्यामुळे संतप्त झालेल्या सर्विस सेंटर चालकाने कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या भरारी पथकातील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास शिवीगाळ व मारहाण (Beating) केल्याचा प्रकार सिन्नर येथे घडला आहे. याप्रकरणी संबंधित सर्विस सेंटर चालकाच्या विरोधात सरकारी कामात अडथळा व सरकारी कर्मचाऱ्यास शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime News)

देवा मल्हारी बोडके याचे सिन्नर येथील हॉटेल शाहू समोर ओम चैतन्य सर्विस सेंटर या नावाने दुकान आहे. या दुकानात वीज चोरून वापरली जात असल्याचा प्रकार महावितरणच्या नाशिक रोड येथील भरारी पथकातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता विधुतकुमार विजय पवार यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने बुधवारी (दि.१४) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आणला.

सदर ठिकाणी पंचनामा करत असताना देवा बोडके याने श्री. पवार यांना कारवाई करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाईट साईट शिवीगाळ करून हाताच्या चापटीने मारहाण केली. तसेच हातातील पकडीच्या सहाय्याने पथकातील एका कर्मचाऱ्यास देखील मारहाण केली.

Crime News
Nashik Bribe Crime : बदापूरचे ग्रामपंचायत सदस्य रामनाथ देवडे लाच घेताना ACBच्या जाळ्यात!

तुम्ही पुन्हा कारवाई करण्यासाठी सर्विस सेंटर कडे आला तर तुमच्याकडे बघून घेईल असा दम त्याने भरारी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना भरला. या प्रकारानंतर श्री. पवार यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात बोडके यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे व सरकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण केली म्हणून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Crime News
Solapur Crime : लॉजवर तरुणीचा विनयभंग; सोलापुरातील दोघांविरुद्ध गुन्हा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com