Nashik Crime News : नाशिक रोडला गोळीबार; शिवसेनेच्या ठाकरे अन् शिंदे गटात जुंपली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik news

Nashik Crime News : नाशिक रोडला गोळीबार; शिवसेनेच्या ठाकरे अन् शिंदे गटात जुंपली

नाशिकरोड : शिवजयंतीच्या बैठकी दरम्यान देवळालीगावातील गणेश मंदिर सार्वजनिक पार येथे गुरुवारी (ता. १९) सायंकाळच्या सुमारास शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटात बाचाबाची झाली. यावेळी एकाने हवेत गोळीबार केला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. दरम्यान, देवळालीगावात दंगाविरोधी पथक दाखल झाले आहे. (Nashik Crime news Riot between shivsena Thackeray and shinde groups at Nashik road on shivjayanti planning)

हेही वाचा: Nashik Crime News : कहांडळ वाडीत लष्करात असलेल्या भावंडांकडे भर दुपारी घरफोडी

दोन्ही गट तलवारी कोयते, लाठ्या काठ्या काढून एकमेकांवर धाऊन गेले. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केल्याचे समजते. या घटनेमुळे तणावाचे वातावरण तयार झाले नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

उपनगरचे सहाय्य पोलिस निरीक्षक सचिन चौधरी यांना माहिती मिळताच ते पोलिसांसह दाखल झाले. त्यांनी दोन्ही गटाला समजाविण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटांनी आरोपी प्रत्यारोप केले. वाद व तणाव वाढतच गेल्याने सचिन चौधरी यांनी वरिष्ठांना कळवले.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

हेही वाचा: Jalgaon Crime News : पत्नी झोपेतून उठली अन्‌ पतीचा मृतदेह दिसला

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त सिध्देश्वर धुमाळ, उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक माईनकर, नाशिकरोडचे अनिल शिंदे, देवळाली कॅम्पचे कुंदन जाधव तातडीने दाखल झाले. काही राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला.

वातावरण तणावपूर्ण होते. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण दुकाने बंद झाली आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या देवळालीगावत काही दिवसांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. काही पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेना गटात दाखल झाले. तर काही पदाधिकारी नुकतेच ठाकरे गटात दाखल झाले आहेत.

हेही वाचा: Jalgaon Crime News : राणीचे बांबरूड येथील दोघांना 5 वर्षांची शिक्षा; पाचोरा न्यायालयाचा निर्णय