Nashik MD Drugs Crime : एमडी ड्रग्ज विक्री करणारे आणखी दोघे जेरबंद; गुन्‍हे शाखा युनिट एकची कामगिरी

MD Drugs Crime : मोफेड्रॉन ड्रग्ज (एमडी) विक्रीचे रॅकेट अद्यापही सक्रिय असून, हे रॅकेट समूळ नष्ट करण्याचे आव्‍हान पोलिस यंत्रणेसमोर आहे.
A cache of MD drugs seized by Unit One of the Crime Branch.
A cache of MD drugs seized by Unit One of the Crime Branch.esakal

Nashik MD Drugs Crime : मोफेड्रॉन ड्रग्ज (एमडी) विक्रीचे रॅकेट अद्यापही सक्रिय असून, हे रॅकेट समूळ नष्ट करण्याचे आव्‍हान पोलिस यंत्रणेसमोर आहे. पोलिसांकडून सातत्‍याने कारवाई सुरु असून, गुन्‍हे शाखेच्‍या युनिट एकने कारवाई करत ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना अटक करत त्‍यांच्‍याकडून नव्वद हजार रुपये किमतीचा अठरा ग्रॅम्‍स साठा व गुन्ह्यात वापरलेली चारचाकी हस्‍तगत केली आहे. (Nashik Crime Two more MD drug dealers jailed by police marathi news)

फारुख शेख (रा. श्रमिक नगर, गंजमाळ) आणि महेश ऊर्फ नाना दत्तात्रय शिरोळे (रा. शिवाजी नगर, इगतपुरी) अशी अटक केलेल्‍या दोघा संशयितांची नावे आहेत. दोघे संशयित चारचाकी वाहनातून गंजमाळ येथील पंचशील नगर भागातील म्हसोबावाडी समोरील महापालिका उद्यान येथे एमडी (मॅफेड्रॉन) पावडर विक्रीसाठी येणार असल्‍याची माहिती गुन्‍हे शाखेला मिळाली होती.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलिस हवालदार स्मेश कोळी, देविदास ठाकरे, पोलिस अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप, मुक्तार शेख, राजेश राठोड, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे आदींच्‍या पथकाने सापळा लावत संशयितांना अटक केली.

A cache of MD drugs seized by Unit One of the Crime Branch.
Nashik MD Drugs Crime: एमडी ड्रग्ज विक्री करताना एकाला अटक; 27 हजाराचे ड्रग्ज जप्त

संशयितांपैकी फारुख शेख याच्या झडतीत पंधरा हजार रुपये किमतीचा तीन ग्रॅम एमडी (मॅफेड्रॉन) तसेच मोबाईल हस्‍तगत केला. तर महेश दत्तात्रय शिरोळेच्या झडतीत ७५ हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम एमडी (मॅफेड्रॉन) तसेच मोबाईल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असे दोघांच्या ताब्यातून एकूण दोन लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयितांविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल केला आहे.

आठवड्याभरात दुसरी घटना

यापूर्वी पोलिसांनी वेळोवेळी कारवाई करताना एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्यांची धरपकड केली जात आहे. ड्रग्ज उत्‍पादन करणारा कारखाना नष्ट केला होता. वेळोवेळी पोलिस कारवाईचा बडगा उगारत आहेत, असे असतानाही आठवड्याभरात ड्रग्जप्रकरणी ही दुसरी घटना उघडकीस आली आहे. सातत्‍याने घटना उघडकीस येत असल्याने अद्यापही ड्रग्ज विक्रीचे धाडस करणाऱ्यांना गजाआड करण्याचे आव्‍हान पोलिस यंत्रणेसमोर आहे.

A cache of MD drugs seized by Unit One of the Crime Branch.
Nashik MD Drugs Crime : ‘एमडी’ विक्रीचे प्रयत्‍न सुरुच! पंचक परिसरातून विक्रेता ताब्‍यात; दोघांचा शोध सुरु

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com