Nashik MD Drugs Crime : ‘एमडी’ विक्रीचे प्रयत्‍न सुरुच! पंचक परिसरातून विक्रेता ताब्‍यात; दोघांचा शोध सुरु

Crime News : मॅफेड्रॉन (एमडी) ड्रग्‍जचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांकडून सातत्‍याने कारवाई केली जात आहे
Deputy Commissioner of Police Monika Raut, Assistant Commissioner Sachin Bari, Senior Inspector Ramdas Shelke and other officers are suspected.
Deputy Commissioner of Police Monika Raut, Assistant Commissioner Sachin Bari, Senior Inspector Ramdas Shelke and other officers are suspected.esakal

नाशिक/नाशिक रोड : मॅफेड्रॉन (एमडी) ड्रग्‍जचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांकडून सातत्‍याने कारवाई केली जात आहे. असे असतानाही दुसरीकडे एमडी ड्रग्ज विक्रीचे प्रयत्‍न शहरात अद्यापही सुरुच असल्‍याचे समोर येत आहे.

रविवारी (ता.२४) सायंकाळी साडे सातच्‍या सुमारास पंचक गावाजवळ कारवाई करताना नाशिक रोड पोलिसांनी विक्रेत्‍याला बेड्या ठोकत त्‍याच्‍याकडून सुमारे एक लाख रुपयांचा ३२ ग्रॅम वजनाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी आणखी दोघांविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. (Nashik Drugs Crime Attempts to sell MD continue marathi news)

एमडी ड्रग्ज विक्रीच्‍या प्रयत्‍नात असलेल्‍या संशयिताचे नाव सागर शिंदे (३०, रा. पिंपळपट्टी रोड, जेलरोड) असे आहे. यापूर्वी एमडी तयार करणारा कारखाना तसेच गोदामावर कारवाई करताना नाशिक रोड पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचा एमडीचा साठा जप्त केला होता.

यानंतरही सातत्‍याने एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाईचा धडाका सुरु आहे. तरीदेखील शहरात एमडी ड्रग्‍जची विक्री सुरु असल्‍याने यंत्रणादेखील चक्रावली आहे. दरम्‍यान गस्‍तीवर असताना नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला पिंपळपट्टी रोड परिसरात संशयित एमडी विक्रीच्या प्रयत्नात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. (latest marathi news)

Deputy Commissioner of Police Monika Raut, Assistant Commissioner Sachin Bari, Senior Inspector Ramdas Shelke and other officers are suspected.
Mumbai Crime News: धक्कादायक! घरासाठी लागणार होते तब्बल 23 लाख; पैशासाठी 9 वर्षाच्या मुलाचं अपहरण करुन केली हत्या!

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांना माहिती दिली. यानंतर पथकाने परिसरात सापळा रचत शिताफीतीने संशयित सागरला ताब्‍यात घेतले. पोलिसी खाक्‍या दाखविताच त्याने जाफर पटेल (रा. कथडा, जुने नाशिक) व सैफुला भाई (रा. अशोका रोड) या संशयितांकडून एमडी घेतल्याची कबुली दिली.

यानंतर संशयित सागरसह जाफर व सैफुला अशा तिघांविरोधात नाशिक रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील इतर दोघे संशयित जाफर व सैफुला यांचा पोलिस शोध घेत आहेत.

Deputy Commissioner of Police Monika Raut, Assistant Commissioner Sachin Bari, Senior Inspector Ramdas Shelke and other officers are suspected.
Pune Crime News : चाकण,महाळुंगे परिसरातली गुन्हेगारी धोकादायक ; गुन्हेगारीला चाप लावण्याची गरज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com