Vishnu Bhagwat Crime Case: विष्णू भागवतला जायखेडा पोलिसांकडून अटक; अपहरणनाट्यातून सुटताच ग्रामीण पोलिसांची कारवाई

Crime News : दामदुप्पट योजनेत आर्थिक गुंतवणुकीची प्रलोभने दाखवून फसणूक करणाऱ्या संशयित विष्णू भागवत याला नाशिक ग्रामीणच्या जायखेडा पोलिसांनी अटक केली आहे.
Arrested
Arrestedesakal

नाशिक : दामदुप्पट योजनेत आर्थिक गुंतवणुकीची प्रलोभने दाखवून फसणूक करणाऱ्या संशयित विष्णू भागवत याला नाशिक ग्रामीणच्या जायखेडा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने भागवत यास सोमवारपर्यंत  (ता. ४) पोलीस कोठडी सुनावली आहे. (nashik crime Vishnu Bhagwat Arrested by Jaikheda Police fraud crime Action of rural police marathi news)

जायखेडा पोलीस ठाण्यामध्ये विष्णू भागवत याच्याविरोधात फसवणूक व एमपीआयडीअंतर्गत गुन्हा दाखल आहे. भागवत याने संकल्पसिद्धी या संस्थेच्या माध्यमातून परिसरातील १८ ते २० तक्रारदारांची २७ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये जायखेडा पोलीस संशयित विष्णू भागवत याचा शोध घेत होते.

परंतु तो पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार होत होता.  या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे पोलिस त्याचा शोध घेत होते. परंतु तो पोलिसांना मिळून येत नव्हता. अखेर, गेल्या बुधवारी (ता. २८) भागवत बंधूंच्या अपहरण नाट्यानंतर तो गुरुवारी (ता.२९) मध्यरात्री सरकारवाडा पोलिसात हजर झाला होता.

त्याची खबर मिळताच जायखेडा पोलिसांनी विष्णू भागवत याचा ताबा घेत अटक केली आहे. त्यास मालेगाव न्यायालयात हजर केले असता, सोमवारपर्यंत  (ता. ४) पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ हे करीत आहेत. (Latest Marathi News)

Arrested
Nashik Crime: भागवत बंधुंचे पैशांसाठी अपहरण अन्‌ सुटका! गुंतविलेल्या रकमेची केली मागणी; गुन्हा दाखल

असा अडकला विष्णू...

माऊली मल्टीस्टेट व संकल्पसिद्‌धी यात आर्थिक गुंतवणूक केल्यास दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी विष्णू भागवत याच्याविरोधात राज्यासह परराज्यात गुन्हे दाखल आहेत. २०२० मध्ये नाशिक शहर आर्थिक गुन्हेशाखेने विष्णूला अटकही केली होती. सध्या तो जामीनावर आहे.

दरम्यान २८ फेब्रुवारी सायंकाळी नाशिकच्या सीबीएस चौकातून विष्णूसह त्याचा भाऊ रुपचंद भागवत या दोघांचे अपहरण करण्यात आले होते. गुरुवारी (ता.२९) सकाळी रुपचंदची तर सायंकाळी विष्णूची लोणी येथे अपहरणकर्त्यांनी सुटका केली होती. मध्यरात्रीच्या सुमारास विष्णू सरकारवाडा पोलिसात दाखल झाला होता. त्याची खबर ग्रामीण पोलीसांना मिळताच जायखेडा पोलिसांनी विष्णूचा ताबा घेत अटक केली.

Arrested
Nagpur Crime: लग्न मोडण्यासाठी गेटवर बॉम्ब लावणाऱ्याची सुटका, पोलीस कोठडीसाठी पोलिसांची न्यायालयात धाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com