Nashik News : सी-व्हिजिल ॲपवरील तक्रारीचे तासाभरात निवारण! वावी येथील सरकारी जाहिरातीतील राजकिय नेत्यांचे फोटो पुसले

Nashik News : हे ॲप उघडल्यानंतर तक्रारकर्त्याचे जीपीएस लोकेशन निवडणूक आयोगाच्या सिस्टीमवर ट्रॅक केले जाते
Officer while redressal of complaint on CVigil app.
Officer while redressal of complaint on CVigil app.esakal

वावी : आचारसंहिता भंगाच्या तक्रारींचे निवारणासाठी भारत निवडणूक आयोगाने लॉन्च केलेल्या सी व्हिजिएल ॲपवर केलेल्या तक्रारीचे अवघ्या तासाभरात निवारण झाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंगाच्या तक्रारींसाठी ॲप तयार केले आहे.

त्या तक्रारींचे निवारण शंभर मिनिटाच्या आत करण्यात येते. हे ॲप उघडल्यानंतर तक्रारकर्त्याचे जीपीएस लोकेशन निवडणूक आयोगाच्या सिस्टीमवर ट्रॅक केले जाते. (Nashik CVigil app Photos political leaders in Vavi take down marathi news)

नेत्यांच्या छबी असलेले सरकारी योजनांचे पोस्टर झाकणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ॲपवर ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. ही तक्रार निवडणूक आयोगाकडून संबंधित झोनल अधिकाऱ्याकडे फॉरवर्ड झाल्यानंतर अवघ्या तासाभरात फ्लाईंग स्क्वाड येथे लोकेशन ट्रॅक करत पोचले.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोस्टरवरील नेत्यांच्या छबी पेंटने पुसून टाकल्या. पथकातील अधिकाऱ्यांनी नंतर संपूर्ण गावात गस्त घालून निवडणूक आचारसंहिता भंग करण्यास कारणीभूत ठरणारे पक्षांचे बॅनर, राष्ट्रीय नेत्यांचे फोटो असणारे पोस्टर्स काढून टाकण्याच्या सूचना केल्या. (latest marathi news)

Officer while redressal of complaint on CVigil app.
cVIGIL App : आचारसंहितेचा टोल फ्री क्रमांक 1950 बंद! सीव्हिजिल ॲपवर तक्रार करण्याचे आवाहन

"आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोचविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी व्हिजिल ॲप विकसित केले आहे. या ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. ॲपवर तक्रार मिळताच तत्काळ त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते."

-डॉ. शशिकांत मंगरुळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक

Officer while redressal of complaint on CVigil app.
Solapur Lok Sabha Election 2024 : तुमचंही सोलापुरात स्वागत...; भाजपकडून राम सातपुतेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणिती शिंदेंचा टोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com