Dada Bhuse : शहरातील गुन्हेगारी आवरा पालकमंत्री भुसे यांच्या पोलिसांना सूचना

Dada Bhuse : शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत येत्या आठवड्याभरात टवाळखोरांना धडा शिकवून मुसक्या आवळण्याच्या सूचना केल्या.
District Collector Jalaj Sharma, Deputy Commissioner of Police Prashant Bachhav, Monica Raut, Chandrakant Khandvi, Ajay Boraste were present in the meeting along with Guardian Minister Dada Bhuse.
District Collector Jalaj Sharma, Deputy Commissioner of Police Prashant Bachhav, Monica Raut, Chandrakant Khandvi, Ajay Boraste were present in the meeting along with Guardian Minister Dada Bhuse.esakal

Dada Bhuse : शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत येत्या आठवड्याभरात टवाळखोरांना धडा शिकवून मुसक्या आवळण्याच्या सूचना केल्या. गेल्या महिनाभरात गंभीर गुन्हे घडले याची दखल घेत शुक्रवारी (ता. २३) बैठक घेण्यात आली. (nashik dada bhuse statement to police marathi news )

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी जलज शर्मा, शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवी, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते उपस्थित होते. या वेळी पालकमंत्री भुसे यांनी शहरात रस्त्यावर पोलिसांनी दिसायला हवे.

District Collector Jalaj Sharma, Deputy Commissioner of Police Prashant Bachhav, Monica Raut, Chandrakant Khandvi, Ajay Boraste were present in the meeting along with Guardian Minister Dada Bhuse.
Dada Bhuse: शेतकऱ्यांना बसणार आश्चर्याचा धक्का ! मुख्यमंत्री 'या' दिवशी करणार मदत जाहीर, दादा भुसेंनी दिली माहिती

यासाठी पोलिसिंग वाढविण्याच्या सूचना केल्या असून, दामिनी पथक सक्रिय करून टवाळखोरांना धडा शिकवा, तसेच अवैध धंदे तातडीने बंद करून शहरात शांतता हवी आहे त्यासाठी सर्वोतोपरी यंत्रणा राबविण्याच्या सूचना या वेळी केल्या.

येत्या आठ दिवसांत कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्याच्या सूचना केल्या. शहरातील ब्लॅक स्पॉट शोधून कोंबिंग करून सराईत गुन्हेगार शोधून त्यांची कसून चौकशी करण्याची सूचना करतानाच उपद्रवी असतील त्यांची शहरातून धिंड काढण्याची सूचना दिली. (latest marathi news)

District Collector Jalaj Sharma, Deputy Commissioner of Police Prashant Bachhav, Monica Raut, Chandrakant Khandvi, Ajay Boraste were present in the meeting along with Guardian Minister Dada Bhuse.
Dada Bhuse : कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण सरकारच्या माध्यमातून दिले जाईल : दादा भुसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com