Nashik News : कांद्यावर युरियाचे पाणी टाकून नुकसान; द्यानेतील शेतकऱ्याला लाखो रुपयांना फटका

Nashik : एकीकडे कांदा दरात झालेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादक हवालदिल झाला आहे.
Villagers inspecting the onion loss of Sagar Kapadnis here.
Villagers inspecting the onion loss of Sagar Kapadnis here.esakal

Nashik News : एकीकडे कांदा दरात झालेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादक हवालदिल झाला आहे. दरानुसार उत्पादन खर्चदेखील निघणे मुश्किल असल्याने कांदा चाळीत साठवण करीत दरवाढीच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, कांदा उत्पादकांनी साठवणुकीवर भर दिला असतानाच अज्ञात समाजकंटकाने शेतात ठेवलेल्या कांद्यावर युरियाचे पाणी टाकल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. (Nashik Damage caused by pouring urea water on onions to farmer marathi News )

द्याने (ता. बागलाण) येथील कांदा उत्पादक शेतकरी सागर किसन कापडणीस यांची द्याने शिवारात गट क्रमांक २७३ मध्ये वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. श्री. कापडणीस यांनी परिसरात पाण्याचे जलस्रोत कमी प्रमाणात असतानादेखील मोठ्या कष्टातून कांदा पिकवला. सध्या मजुरांच्या मदतीने कांदा काढणी सुरू आहे.

दोन दिवसांपासून कांद्याची प्रतवारी करून चाळीत साठवणुकीचे काम सुरू होते. दरम्यान, शेतातील कांद्याची पात बाजूला करीत असतानाच सागर कापडणीस यांना कांद्यावर युरियाचे पाणी टाकलेले निदर्शनास आले. कष्टातून पिकवलेल्या कांद्याची नासाडी झाल्यामुळे कापडणीस यांच्या पायाखालची जमीन सरकली.

ग्रामपंचायत सदस्य सचिन (बाला) कापडणीस, प्रमोद कापडणीस, नथू कापडणीस, माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद पंडित कापडणीस, नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब आर. कापडणीस, अरूण कापडणीस, रवींद्र कापडणीस, गिरीश कापडणीस, पंकज कापडणीस, मधुकर कापडणीस, संदिप कापडणीस, शेखर कापडणीस, उपसरपंच के. पी. कापडणीस व सहकाऱ्यांनी पाहणी करून कापडणीस यांना धीर दिला. श्री. कापडणीस यांनी जायखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (latest marathi news)

Villagers inspecting the onion loss of Sagar Kapadnis here.
Nashik News : विद्यार्थी पटसंख्या अन्‌ मोफत पाठ्यपुस्तकांचा बसेना मेळ; जुनी पुस्तके जमा करण्याची वेळ

कांदा चाळीवर आता तिसरा डोळा

शेतात बऱ्याच वेळा चोरट्यांकडून रात्रीतून शेतीपयोगी साहित्य, शेतमालाचे नुकसान तसेच विद्युतपंप साहित्य चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, चोरटे हाती लागलेले नाहीत. मोसम पट्ट्यातील द्याने शेतीशिवारातील शेतकरी उत्कृष्ट शेती करीत आहेत. यामुळेच पिकांचे भरघोस उत्पादन घेतात.

शेतातील परिपक्व पिकांचे नुकसान होत असल्याने पिकांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्‍याची नजर असणार आहे. कुठलाही चोरीचा प्रकार घडू नये, यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा चाळीवर सीसीटीव्ही बसविले आहेत.

''शेतातील कांद्यावर अज्ञात व्यक्तीने युरियाचे पाणी टाकल्याचे निदर्शनास आले. यात माझे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी.''- सागर कापडणीस, कांदा उत्पादक, द्याने

Villagers inspecting the onion loss of Sagar Kapadnis here.
Nashik News : गाळाने भरलेल्या नांदूरमध्यमेश्वर धरणाकडे दुर्लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com