वणी: जिल्ह्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सतत होणारे बिबट्याचे हल्ले यामुळे मनुष्यहानीबरोबरच मोठ्या प्रमाणात पशुहानीच्या घटना होत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात नाशिकच्या वडनेर दुमाला भागात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरड्याचा, तर दिंडोरी शिवारात झालेल्या महिलेच्या मृत्यूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेत बिबट्या हल्ल्याच्या घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.