Dindori Lok Sabha Constituency : बिगर आदिवासी मतदारच ठरवणार आदिवासी खासदार!

Political News : आदिवासींचे सहा लाख १२ हजार तर बिगर आदिवासींचे १२ लाख २९ हजार मतदान
Dindori Lok Sabha Constituency
Dindori Lok Sabha Constituencyesakal

नाशिक : अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा बिगर आदिवासी मतदारच ठरवतात. उमेदवार हा आदिवासीबहुल दिंडोरी, कळवण, सुरगाणा या भागातील असला तरी खासदार ठरविण्याची भूमिका मात्र निफाड, चांदवड, येवला, नांदगाव या बिगर आदिवासी विधानसभा मतदारसंघांवरच विसंबून असते. (nashik Dindori Lok Sabha Constituency tribal MP news)

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात दिंडोरी-पेठ, कळवण-सुरगाणा, देवळा-चांदवड, निफाड, नांदगाव आणि येवला या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. संपूर्ण मतदारसंघात एकूण १८ लाख ४१ हजार मतदार आहेत. त्यापैकी आदिवासीबहुल कळवण, सुरगाणा या मतदारसंघात दोन लाख ९२ हजार तर दिंडोरी व पेठ या मतदारसंघात तीन लाख २९ हजार मतदार आहेत.

आदिवासीबहुल मतदार संघाचा विचार केल्यास तीन लाख १२ हजार मतदार हे या मतदारसंघाचे भवितव्य ठरवितात. तर बिगर आदिवासीबहुल म्हणून प्रचलित असलेल्या नांदगाव या मतदारसंघात तीन लाख तीस हजार, येवल्यामध्ये तीन लाख १२ हजार, चांदवड देवळामध्ये दोन लाख ९७ हजार तर निफाडमध्ये दोन लाख ८९ हजार मतदार आहेत.

या बिगर आदिवासी विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर आदिवासींपेक्षा दुप्पट म्हणजेच बारा लाख २९ हजार मतदार हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदान करणार आहेत. त्यांची भूमिका या मतदारसंघासाठी निर्णायक असून आदिवासीबहुल मतदारसंघ असला तरी बिगर आदिवासी मतदारांचे प्राबल्य यात मोठ्या प्रमाणात दिसून येते.

मात्र, प्रत्यक्षात बिगर आदिवासी तालुक्यातील हाच मतदार मतदानासाठी आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातीलच प्रश्नांभोवती ही निवडणूक रंगत आल्याचे चित्र आजवरच्या निवडणुकीत दिसून आले.  (latest marathi news)

Dindori Lok Sabha Constituency
Chandrapur Lok Sabha Constituency : मुनगंटीवार-धानोरकर यांच्यात थेट लढत

या तुलनेत दिंडोरी, पेठ, सुरगाणा व कळवण या मतदारसंघातून मतदानाची टक्केवारी ही फारशी समाधानकारक नसते. त्यातही काँग्रेस व राष्ट्रवादीला मानणारा वर्ग जास्त असल्याचे आजवरच्या मतदानाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. त्यामुळे हाच घटक दिंडोरीचा खासदार ठरवत असल्याचे दिसून आले आहे.

निवडणूक कार्यक्रम -

नामनिर्देशन पत्र दाखल करणे - २६ एप्रिल ते ३ मे (स. ११ ते दु. ३ वाजेपर्यंत)

अर्ज छाननी - ४ मे (सकाळी ११ वाजेपासून )

अर्ज माघारी - ६ मे (सकाळी ११ वाजेपासून)

मतदान - २० मे (सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत)

मतमोजणी-४ जून (सकाळी ८ वाजेपासून)

Dindori Lok Sabha Constituency
Lok Sabha Election : पत्नीच्या मदतीने संसद प्रवेशाचे स्वप्न; ‘बाहुबली’ पतीऐवजी निवडणूक रिंगणात ; उज्ज्वलकुमार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com