Nashik Disability Survey : 30 वर्षांनंतर दिव्यांग सर्वेक्षणाला मुहूर्त! आशा, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेवक करणार सर्वेक्षण

Nashik News : दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात असल्या, तरी त्यांची प्रवर्गनिहाय आकडेवारी उपलब्ध होत नसल्याने दिव्यांगांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते
Disability
Disability esakal

नामपूर : दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात असल्या, तरी त्यांची प्रवर्गनिहाय आकडेवारी उपलब्ध होत नसल्याने दिव्यांगांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अखेर ३० वर्षांनंतर दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने घेतला आहे. दिव्यांगांच्या प्रकारात वाढ झाल्याने दिव्यांगांच्या संख्याही निश्चितच वाढेल, असा अंदाज आहे. आशा, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेवक सर्वेक्षण करणार आहेत. (Nashik Disability Survey Asha anganwadi workers health workers conduct news)

दिव्यांगाचे सर्वांगीण पुनर्वसन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ३१ जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण होणार आहे. राज्यभरात मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरोघरी जाऊन दिव्यांगांची माहिती संकलित होणार असून, सर्वेक्षणासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला असून, आवश्यकतेनुसार त्यात वाढ होईल.

सर्वेक्षणातून दिव्यांगांची नेमकी संख्या स्पष्ट होऊ शकणार आहे. राज्यातील दिव्यांगांची संख्या २०११ च्या जनगणनेनुसार २९ लाख ६३ हजार होती. राज्याच्या एकूण लोकसंख्येत दिव्यांगांचे प्रमाण २.६ टक्के होते. जुन्या कायद्यात दिव्यांगांचे सातच प्रकार होते. दिव्यांग व्यक्ती हक्क संमत नवीन कायद्यानुसार दिव्यांगांचे २१ प्रकार निश्चित केले आहेत. कायद्यानुसार दर पाच वर्षांनी सर्वेक्षण करण्याची तरतूद आहे. मात्र, असे सर्वेक्षण अद्याप झालेले नाही.  (latest marathi news)

Disability
Jalgaon Gold Rate : सोन्याने गाठला 70 हजारांचा टप्पा

खरी आकडेवारी येणार समोर

राज्यातील अकोला, परभणी, सातारा जिल्ह्यांत सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, तर बीड, धुळे, ठाणे या जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण सुरू आहे. त्यामुळे आता उर्वरित जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण होणार आहे. त्यातून राज्यातील दिव्यांगांची संख्या समोर येणार आहे.

दिव्यांग व्यक्ती अधिकार कायद्यात दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण, तपासणी व दिव्यांगत्वाचे कारण शोधण्यासाठी संशोधन करण्याची तरतूद आहे. त्या आधारे दिव्यांग व्यक्तींसाठी आरोग्य सुविधा, दिव्यांगत्व प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी उपक्रम, योजना आखण्याबाबत नमूद केले आहे.

दिव्यांगाचे प्रकार

अंध, दृष्टिदोष, कर्णबधीर, वाचादोष, अस्थिव्यंग, मानसिक आजार, अध्ययन अक्षमता, सेरेब्रल पालसी (मेंदूचा पक्षाघात, स्वमग्न, बहुविकलांग, कुष्ठरोग, बुटकेपणा, मतिमंद, अविकसित मांसपेशी, मज्जासंस्थेचे तीव्र आजार, मेंदूतील चेतासंस्थासंबंधी आजार, रक्तासंबंधी कॅन्सर, रक्तवाहिन्यासंबंधित आजार, सिकलसेल, ऍसिड हल्लाग्रस्त पीडित, कंपावत.

Disability
Nashik Ramadan Eid Festival : रमजान पर्वामुळे बेकरी व्यवसाय तेजीत! दररोज 3 हजार गोणी मैदाची विक्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com