esakal | सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात रूग्णसंख्या ४ हजारपेक्षा कमी; मात्र, ३७ जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Corona updates

सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात रूग्णसंख्या ४ हजारपेक्षा कमी; मात्र, ३७ जणांचा मृत्यू

sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : जिल्ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या काही प्रमाणात घटत असून, सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात चार हजाराहून कमी बाधित आढळले. मंगळवारी (ता. २७) दिवसभरात तीन हजार ६६१ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर चार हजार ९८८ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंची संख्या अद्यापही चिंताजनक असून, ३७ बाधितांचा दिवसभरात मृत्‍यू झाला.

४६ हजार ४७४ बाधितांवर उपचार सुरु

कोरोनाच्‍या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जारी केलेल्‍या निर्बंधांमुळे अनेक ठिकाणांवर गर्दी नियंत्रणात आलेली आहे. यातून नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या काही प्रमाणात घटली असली तरी, अद्यापही आकडा मोठाच आहे. मंगळवारी नाशिक शहरातील एक हजार ९५४, नाशिक ग्रामीणमधील एक हजार ६७०, मालेगाव महापालिका क्षेत्रातील सोळा तर, जिल्‍हा बाहेरील २१ रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. दुसरीकडे कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील दोन हजार ६५७, नाशिक ग्रामीणमधील दोन हजार १९८, मालेगावच्‍या ४८ आणि जिल्‍हा बाहेरील ८५ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्ह्यात झालेल्‍या ३७ मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील तेरा आणि नाशिक ग्रामीणमधील २४ रूग्णांचा समावेश आहे. नाशिक ग्रामीण भागात नाशिक तालुक्‍यांतर्गत देवळाली कॅम्‍प, भगूर आणि शेवगे दारणा, पिंपळनेर, चांदवड व निफाड तालुक्‍यातील प्रत्‍येकी पाच, इगतपुरी व सिन्नर तालुक्‍यातील प्रत्‍येकी तीन, दिंडोरी तालुक्‍यातील दोन आणि कळवण व त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील प्रत्‍येकी एका बाधिताचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. जिल्ह्यात सद्यःस्‍थितीत ४६ हजार ४७४ बाधितांवर उपचार सुरु आहेत.

हेही वाचा: मरायचे असेल तर अकराच्या आत! शहरात मृताचा शेवटचा प्रवासदेखील खडतर

सात हजार ४०० अहवाल प्रलंबित

मंगळवारी सायंकाळी उशीरा जिल्‍हाभरातील सात हजार ४०० अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणमधील चार हजार ५७७‍, नाशिक महापालिका क्षेत्रातील दोन हजार २८२ तर, मालेगावमधील ४४१ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. दरम्‍यान, जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात दाखल होणाऱ्या संशयित रुग्‍णसंख्येतही घट झाली आहे. दिवसभरात दोन हजार ७४३ संशयित दाखल झाले आहेत. यापैकी दोन हजार ४१६ रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्‍हा रुग्‍णालयात सोळा, तर डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात २१ रुग्‍ण दाखल झाले.

हेही वाचा: होम क्वारंटाईन कोरोनाबाधितांसाठी ‘आयएमए’तर्फे ‘नाशिक कोविड हेल्पलाइन’

मुंबई, पुण्याइतके नाशिकला बाधित

जिल्ह्यातील नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या घटली असली तरी, राज्‍यातील अन्‍य शहरांच्‍या तुलनेत ही संख्या लक्षणीय आहे. बुहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रात चार हजार ०१४, तर पुणे महापालिका क्षेत्रात तीन हजार ८७१ कोरोना बाधित आढळले आहेत. या तुलनेत नाशिक जिल्ह्यात अद्यापही लक्षणीय संख्या आहे.

loading image
go to top