esakal | जिल्ह्यात सहा हजार 726 कोरोनामुक्‍त; आढळले चार हजार 869 पॉझिटिव्‍ह

बोलून बातमी शोधा

Corona Upadate
जिल्ह्यात सहा हजार 726 कोरोनामुक्‍त; आढळले चार हजार 869 पॉझिटिव्‍ह
sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : दोन दिवसांचा दिलासा मिळाल्‍यानंतर बुधवारी (ता.28) जिल्‍ह्‍यातील कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्‍हा वाढ झाली. असे असले तरी कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अधिक राहिल्‍याने ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत घट झाली आहे. जिल्‍ह्‍यातील मृतांची संख्या चिंताजनक असून, दिवसभरात 37 बाधितांचा मृत्‍यू झाला. चार हजार 869 बाधित आढळले असतांना सहा हजार 726 रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले. सध्या जिल्‍ह्‍यात 44 हजार 580 बाधितांवर उपचार सुरु आहेत.

बुधवारी जिल्‍ह्‍यात झालेल्‍या 37 मृत्‍यूंमध्ये नाशिक ग्रामीणमधील 28 मृतांचा समावेश होता. ग्रामीण भागात निफाड तालुक्‍यातील सर्वाधिक सात बाधितांचा मृत्‍यू झाला. येवला व मालेगाव ग्रामीणमधील प्रत्‍येकी तीन, देवळा, नाशिक तालुका, दिंडोरी, चांदवड आणि सिन्नर तालुक्‍यातील प्रत्‍येकी दोन बाधितांचा कोरोनामुळे बळी गेला. सटाणा, नांदगाव, पेठ, इगतपुरी तालुक्‍यातील प्रत्‍येकी बाधिताचा मृत्‍यू झाला. नाशिक महापालिका क्षेत्रातील सहा बाधितांचा तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील तीन कोरोना बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे.

हेही वाचा: डॉक्टर म्हणताहेत..!"नाशिक-नगरची झंझट नको, आम्हाला ऑक्सिजन द्या"

बरे होणारे रुग्‍ण शहरात अधिक

दिवसभरात दोन हजार 498 कोरोना बाधित नाशिक महापालिका क्षेत्रात आढळले असून, तुलनेत तीन हजार 851 रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले. नाशिक ग्रामीणमध्ये दोन हजार 161 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले असताना दोन हजार 719 रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. मालेगावला 116 तर जिल्‍हा बाहेरील 94 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर मालेगावमधून 91 तर जिल्‍हा बाहेरील 65 रुग्‍ण कोरोनातून बरे झाले.

आठ हजाराहून अधिक रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित

जिल्‍ह्‍यात सायंकाळी उशीरापर्यंत आठ हजार 349 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. यापैकी सर्वाधिक पाच हजार 528 अहवाल नाशिक ग्रामीणमधील आहेत. नाशिक शहरातील दोन हजार 554 तर मालेगावच्‍या 267 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात चार हजार 825 रुग्‍ण दाखल झाले आहेत. यापैकी चार हजार 503 अहवाल नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्‍हा रुग्‍णालयात पाच, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात 18 रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील 244, मालेगावला 55 रुग्‍ण दाखल झाले.

हेही वाचा: महामारी आजारांचा चारशे वर्षांचा इतिहास! सोशल मीडियावर संदर्भासह चित्र व वृत्त