नाशिक जिल्‍हा म्‍युकरमायकोसिसमुक्‍त; जिल्हाधिकारी सूरज मांढरे

७०१ रुग्‍ण झाले बरे, ८४ जणांचा मृत्‍यू
जिल्‍हाधिकारी मांढरे
जिल्‍हाधिकारी मांढरेsakal

नाशिक : कोरोनाच्‍या ओमिक्रॉन व्‍हेरीएंटने(corona omicron varient) चिंता वाढलेली असताना जिल्‍हावासीयांसाठी(nashik) काहीशी दिलासादायक बातमी आहे. दुसऱ्या लाटेत म्‍युकरमायकोसीसने( mucormycosis) थैमान घातलेला होता. अशात मंगळवारी (ता.२८) जिल्ह्यात म्‍युकरमायकोसीसचा एकही सक्रिय रुग्‍ण नसल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे (collector suraj mandhare)यांनी दिली आहे. जिल्ह्यात ७८५ रुग्‍णांना म्‍युकरमायकोसीसचे निदान झाले होते. यापैकी ७०१ रुग्‍ण बरे झाले असून, ८४ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. जिल्‍हाधिकारी मांढरे यांनी जिल्‍हा म्‍युकरमायकोसिसमुक्‍त झाल्‍याचे मंगळवारी जाहीर केले. आत्तापर्यंत ७८५ रुग्‍णांना म्‍युकरमायकोसिसचे निदान झाले होते.

पैकी ७०१ रुग्‍ण बरे झाले असून, ८४ बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. कोरोना महामारीच्‍या दुसऱ्या लाटेत कोरोनावर मात केलेल्‍या रुग्‍णांमध्ये म्‍युकरमायकोसीस हा बुरशीजन्‍य आजार आढळून येत होता. ब्‍लॅक फंगस या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या आजारामुळे अनेक रुग्‍णांचा जीव धोक्‍यात आला होता. या आजाराच्‍या उपचारासाठी लागणाऱ्या ॲम्‍फोटेरेसिन बी इंजेक्‍शनच्‍या उपलब्‍धतेसाठी रुग्‍णांच्या नातेवाइकांना मोठी दमछाक करावी लागली होती. अशात मंगळवारी जिल्‍हा म्‍युकरमायकोसिसमुक्‍त जाहीर झाल्‍याची दिलासादायक बाब आहे.

जिल्‍हाधिकारी मांढरे
नाशिकच्या के. के. वाघ अभियांत्रिकीला ‘शैक्षणिक स्वायत्तता’ संस्थेचा दर्जा

पाचशेहून अधिक शस्त्रक्रिया

हा बुरशीजन्‍य आजार असल्‍याने संबंधित रुग्‍णावर शस्त्रक्रिया करत बुरशीने प्रभावित झालेला भाग काढावा लागत होता. जिल्ह्यात सुमारे ५११ गुंतागुंतीच्‍या शस्त्रक्रिया करण्यात आल्‍या आहेत. यात काही रुग्‍णांचे डोळे किंवा नाकपुडीचा काही भाग काढून टाकावा लागला होता.

बरे झालेले सर्वाधिक रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रात

बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये सर्वाधिक ४२३ रुग्‍ण हे नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. याशिवाय एसएमबीटी महाविद्यालयातून १०३, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयातील ७९, मालेगाव महापालिका क्षेत्र आठ, ग्रामीण रुग्‍णालय येथून २४ रुग्‍ण बरे झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com