District Level Advocates Cricket: नाशिक जिल्हास्तरीय ॲडव्होकेट्स टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उद्यापासून

Nashik News : या स्पर्धेत वकील, न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी व बार टायपिस्ट सहभागी होणार आहेत.
Advocates Cricket
Advocates Cricketesakal

नाशिक : नाशिक महानगर अॅडव्होकेट असोसिएशन व नाशिक जिल्हा राष्ट्रीय संयुक्त अधिवक्ता मंच दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ॲडव्होकेटस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला उद्यापासून (ता. ८) प्रारंभ होत आहे. या स्पर्धा १० तारखेपर्यंत खेळविल्या जाणार आहेत. (Nashik District Level Advocate Tennis Ball Cricket Tournament marathi news)

Advocates Cricket
Anant Radhika Pre Wedding : 'डायमंड बॅग पासून अलिशान कारपर्यत...' अनंत-राधिकाला कुणी काय काय दिले, सगळ्यात महागडं 'गिफ्ट' कुणाचं?

या स्पर्धेत वकील, न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी व बार टायपिस्ट सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धा मेरी क्रिकेट मैदान, तारवाला नगर, तलाठी कॉलनीसमोर, मेरी - दिंडोरी रोड येथे होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन नाशिक महानगर ॲडव्होकेट्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव जाधव, नाशिक जिल्हा राष्ट्रीय संयुक्त अधिवक्ता मंच दिल्लीचे अध्यक्ष ॲड.एस यु सय्यद, ॲड. लिलाधर जाधव व आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धेत सहभागी सर्व संघांना टीशर्ट देण्यात येणार असून मैदानावर अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रथम व द्वितीय संघास रोख पारितोषिक, चषक प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी ॲड.एस यु सय्यद, ॲड. लिलाधर जाधव, ॲड.अरुण माळोदे, ॲड. हर्षल जाधव, ॲड. कांचन ससाणे, ॲड.दीघे हे प्रयत्नशील आहेत. (Latest Marathi News)

Advocates Cricket
International Women's Day : एमएनजीएलच्या वतीने स्त्री शक्तीचा जागर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com