कोरोना लसीकरणात नाशिक राज्यात सहाव्‍या क्रमांकावर

corona vaccination
corona vaccinationcorona vaccination

नाशिक : काही दिवसांपासून मंदावलेल्‍या कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेची जिल्ह्यात पुन्‍हा गती वाढत आहे. एप्रिलनंतर नुकताच गेल्‍या आठवडाभरातील लसीकरणाचा आकडा एक लाखाहून अधिक राहिला. असे असले तरी राज्‍यस्‍तरावर लसीकरणात नाशिक जिल्‍हा सहाव्‍या स्‍थानी आहे. त्‍यामुळे लसीकरणाची आणखी गती वाढविण्याची अपेक्षा व्‍यक्‍त होत आहे. (nashik district rank 6 in state for corona vaccination)

राज्‍यात सर्वाधिक लसीकरण मुंबई जिल्ह्यात झाले आहे. त्‍यापाठोपाठ दुसऱ्या स्‍थानी पुणे जिल्‍हा असून, ठाणे जिल्‍हा तिसरा, नागपूर चौदा, कोल्‍हापूर पाचव्‍या स्‍थानी आहे. नाशिक जिल्ह्यात एप्रिलमध्ये मोहिमेने चांगली गती धरलेली असताना मेमध्ये मात्र तुलनेने कमी प्रमाणात लसीकरण झाले. जूनचेही सुरवातीचे दोन आठवडे जेमतेम लसीकरण झाले. पण १९ जून ते शुक्रवार (ता.२५) या आठवड्यात एक लाखाहून अधिक लसीकरण झाले आहे. खासगी रुग्‍णालयांमध्येही लशी उपलब्‍ध होत असून, यामुळे लसीकरण मोहिमेला गती मिळत असल्‍याची स्‍थिती आहे. येत्‍या काळात अशाच स्वरूपात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढल्‍यास संभाव्‍य तिसऱ्या लाटेचा सामना करणे सोयीचे होईल, असे तज्‍ज्ञांचे म्‍हणणे आहे.

संसर्गाबाबत राज्‍यात पाचवा क्रमांक

कोरोना संसर्गाबाबत राज्‍याच्‍या सार्वजनिक आरोग्‍य विभागाच्‍या दैनंदिन अहवालानुसार नाशिक राज्‍यात पाचव्‍या स्‍थानी आहे. कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग पुणे जिल्ह्याला (दहा लाख ४८ हजार ४०७) झाला आहे. मुंबई जिल्‍हा (सात लाख २२ हजार ७३६) दुसरा, ठाणे जिल्‍हा (पाच लाख ७३ हजार ३१४) तिसरा, नागपूर जिल्‍हा (चार लाख ९२ हजार ३२०) चौथ्या स्‍थानी आहे.

corona vaccination
नाशिक महापालिकेची बनावट वेबसाईट? नागरिकांची फसवणूक

जिल्‍हानिहाय झालेले लसीकरण

(शुक्रवारी सायंकाळी सातपर्यंत)

जिल्‍हा पहिला डोस दुसरा डोस

मुंबई ४१,५७,५०९ ९,६३,९१५

पुणे ३४,२५,४६५ ७,६६,३३७

ठाणे १९,३६,४०९ ४,३७,६०३

नागपूर १२,४९,२०२ ३,२८,६४२

कोल्‍हापूर १०,३५,२८८ २,६३,७०२

नाशिक १०,२३,३८० २,५१,१९६

(स्त्रोत- कोविन पोर्टल)

(nashik district rank 6 in state for corona vaccination)

corona vaccination
नाशिक शहरातील 22 रुग्णालयांना मान्यता रद्द करण्याची नोटीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com