Nashik: जिल्‍ह्यात ‘यिन’ निवडणुकीला आजपासून प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

YIN

नाशिक : जिल्‍ह्यात ‘यिन’ निवडणुकीला आजपासून प्रारंभ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : तरुणाईला उत्‍सुकता असलेली ‘यिन’ची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्‍हाभरातील महाविद्यालयांत ही प्रकिया होणार आहे. यानिमित्त तरुणाईला नेतृत्‍व करण्याची संधी मिळणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘यंग इन्‍स्‍पिरेटर्स नेटवर्क’ अर्थात, (यिन) च्या ॲपवरून ऑनलाइन होणार आहे.

सर्वच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्‍या नेतृत्वगुण विकासासोबत त्‍यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे महत्त्वपूर्ण काम ‘सकाळ’ माध्यम समूहाचे ‘यंग इन्‍स्‍पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाद्वारे केले जाते. ‘यिन’च्या माध्यमातून नेतृत्व विकास कार्यक्रम अर्थात निवडणूक व मतदान प्रक्रिया ॲपवरून ऑनलाइन पद्धतीने होत आहे. राज्‍यस्‍तरावर ही प्रक्रिया पार पडत असून, जिल्‍ह्यातील महाविद्यालयांमध्येही प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी या व्यासपीठाकडे नेतृत्व विकासाचे व्यासपीठ म्हणून पाहतात.

हेही वाचा: विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज तुरुंगात करणार लग्न

राज्‍यस्‍तरावर नेतृत्‍वाची संधी

नेतृत्व विकासाच्या निवडणुका घेत महाराष्ट्र राज्याचे शॉडो कॅबिनेट मंत्रिमंडळ दर वर्षी तयार होत असते. महाविद्यालयीन अध्यक्षापासून जिल्हा अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आणि शेवटी मुख्यमंत्री निवडला जातो. या मंत्रिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात येते. सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून नेतृत्व विकास ही प्रक्रिया देशामध्ये पहिल्यांदाच महाविद्यालयीन तरुणाईसाठी ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘यिन’ने सुरू केली आहे.

नाशिक जिल्‍ह्यात अशी पार पडेल प्रक्रिया

उमेदवारी अर्ज दाखल करणे ११ ते २० नोव्हेंबर

उमेदवार यादी जाहीर करणे २१ नोव्हेंबर

ऑनलाइन प्रचार कालावधी २६ नोव्हेंबर

मतदान २७ नोव्हेंबर

मतमोजणी २ डिसेंबर

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

‘यिन’मध्ये सहभागी होण्यासाठी व आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुगल प्ले स्टोरला भेट द्या आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे Young Inspirators Network ॲप डाउनलोड करा, अन्यथा खालील क्यूआर कोड स्कॅन करा. अधिक माहितीसाठी ‘यिन’चे विभागीय अधिकारी गणेश जगदाळे (९०७५०१७५०८) यांच्याशी संपर्क साधवा.

‘सकाळ समूहा’च्या ‘यिन’ व्यासपीठाने सुरू केलेली ही नेतृत्व विकास प्रक्रिया तरुणाईसाठी उपयुक्त आहे. प्रत्येक क्षेत्रात चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. ही गरज ‘यिन’ निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकेल. आपल्यातील नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी आपल्या महाविद्यालयातून आपला उमेदवारी अर्ज आजच भरावा. सर्व महाविद्यालयीन तरुणाईला या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा.

-सदाशिव रायते, वरिष्ठ यिन निवडणूक निरीक्षक, नाशिक जिल्‍हा तथा माजी न्यायाधीश, जिल्हा सत्र न्यायालय

महाविद्यालयीन तरुणांना आपल्‍यातील क्षमता दाखविण्यासाठी व्‍यासपीठाची आवश्‍यकता असते. ही गोष्ट हेरून विविध पातळ्यांवर ‘यिन’च्‍या माध्यमातून युवकांना हक्‍काचे व्‍यासपीठ लाभले आहे. निवडणुकीतून नेतृत्‍व विकासाची संधी विद्यार्थ्यांना उपलब्‍ध होईल. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा.

-रूपाली खैरे, कनिष्ठ ‘यिन’ निवडणूक अधिकारी, नाशिक जिल्हा

loading image
go to top