

Nashik
esakal
नाशिक रोड: शहरातील एका महिला लोकप्रतिनिधीने डॉक्टर पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची गंभीर तक्रार दाखल केली आहे. नाशिक रोड पोलिस ठाण्यात विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयित आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून, एक दिवसाच्या पोलिस कोठडीनंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.