Nashik News : सिन्नरमधील नाल्यांना गटारांचे स्वरूप! केमिकलयुक्त पाण्याच्या दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य

Nashik News : मैला पाण्याची डबकी, डासांचा उपद्रव आणि दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Drained sewer.
Drained sewer. esakal

सिन्नर : शहरातील अतिशय गजबजलेल्या विजयनगर, मुक्तेश्वरनगर, गवळी मळा, खंडोबा नाला, संगमनेर नाका, नाशिक वेस भागातील ओढ्या-नाल्यांना मैला पाणी व वाढत्या प्रदूषणामुळे गटारांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नाल्यांच्या परिसरात दलदल झाली आहे. मैला पाण्याची डबकी, डासांचा उपद्रव आणि दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Nashik Drains in Sinnar look like sewer health of citizens due to stench of chemical water marathi news)

सर्वांत गंभीर स्थिती नासिक वेस भागातील सरस्वती नदी, खंडोबा नाला, मुक्तेश्वरनगर, संगमनेर नाका, सिन्नर-शिर्डी रोडवरील भूमिगत गटारींची आहे. त्यावर झाकणे नाहीत. नाल्यांच्या दोन्ही बाजूला उंच इमारती, सोसायट्या, शाळांचे जाळे पसरले आहे. ओढ्यांतील पाणी प्रदूषित झाल्याने अनेक आजार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

सतत उग्रवास येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच मांस, मच्छी, कोंबड्यांचे पिसे नदी व नाल्यांमध्ये टाकल्याने प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सायंकाळी सहानंतर कानडी मळा, मुक्तेश्वरनगर, विजयनगर परिसरात केमिकलचा वास येत असल्याने चिमुकल्यांसह ज्येष्ठ नागरिकांना फिरणेही मुश्किल झाले आहे.  (latest marathi news)

Drained sewer.
NMC News : नाशिक महापालिका प्रशासकीय राजवटीची 2 वर्षे; प्रशासक राज लांबले, काम थांबले!

परिसरात हवेतील गुणवत्ताही कमी झाली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना ताप, श्वासनाच्या आजारांची लागण, चक्कर येणे, आदी आजार होत आहेत. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. दुर्गंधीमुळे नाल्यांलगतच्या रहिवाशांना घराचे दरवाजे व खिडक्या बंद कराव्या लागत आहेत. उन्हाळ्यात नागरिकांना उकाड्याला तोंड द्यावे लागत आहे. नाल्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

"नाल्यांच्या दुर्गंधीमुळे घराचे दरवाजे व खिडक्या कायम बंद ठेवाव्या लागत आहेत. लहान मुले आजारी पडत आहेत. संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे."

-शेखर गोळेसर, व्यावसायिक

"सायंकाळी सहानंतरदुर्गंधीयुक्त वास येत असल्याने बाहेर फिरणेही मुश्किल झाले आहे संबंधित प्रशासनाने वास कसला आहे, याचा तपास करून योग्य ती कारवाई करावी. जेणेकरून नागरिक सुटकेचा निःश्वास सोडतील."- अण्णासाहेब गडाख व मधुकर मवाळ

Drained sewer.
Nashik News : येवल्यात मुख्य जलवाहिनी फुटली! दोन तासांत तब्बल 40 ते 50 हजार लिटर पाणी वाया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com