Nashik Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे सिन्नर तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज प्रवाह खंडित!

Nashik News : सिन्नर तालुक्यात रविवारी वादळीवाऱ्यासह गारांचा अवकाळी पाऊस झाला. यामुळे नागिरकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी नुकसान अधिक झाले आहे.
due to Unseasonal rains trees lying on road, Damage to polyhouse
due to Unseasonal rains trees lying on road, Damage to polyhouse esakal

विकास गिते : सकाळ वृतसेवा

Nashik News : सिन्नर तालुक्यात रविवारी वादळीवाऱ्यासह गारांचा अवकाळी पाऊस झाला. यामुळे नागिरकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी नुकसान अधिक झाले आहे. अनेक ठिकाणी घरांवरील तसेच शेडनेटवरील पत्रे उडाले, रस्त्यावर झाडे पडून वाहतूक बंद झाली, वीजतारा तुटल्यानेही काही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

शहरासह तालुक्यात रविवारी रात्री सात वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यात रस्त्यावर पाणी वाहत होते तर तिसऱ्या दिवशी सोमवारी पूर्व भागात पाऊस सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, हा पाऊस काही भागातच पडला आहे. ग्रामीण भागातील पूर्व भागात रविवारी रात्रीपासून पाऊस सुरू असून सोमवारी सकाळी पाऊस सुरू आहे .

शनिवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह अवकाळीने हजेरी लावली. पण, या वादळामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. मानमोडा परिसरातील शेतकरी स्वाती विनायक रानडे यांचे एक एकर पॉलिहाऊसचे लाखोचे नुकसान झाले आहे तसेच त्यावरील छप्पर उडून गेले. सिन्नर शहरातील सिन्नर शिर्डी रोड येथील रस्त्यावर तसेच दातली देवपूर, फरदापुर, धारणगाव, नांदूर शिंगोटे, कोकणी, वावी आधी ठिकाणी झाडे पडले.

रस्त्यावर पाणी साचल्याने दुचाकी, चार चाकी वाहनचालकांना पाण्यातून मार्गक्रमण करावे लागत होते. जवळपास पूर्व भागात रात्रभर वादळी पाऊस सुरू होता. वादळामुळे तालुक्यातील देवपूर ,पंचाळे, भोकणी धारणगाव, फरदापुर, नांदूर शिंगोटे, दातली, खोपडी आधी परिसरात मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद झाली आहे. वीजवाहिन्यावरही झाडे पडली आहेत. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित झाला आहे. (latest marathi news)

due to Unseasonal rains trees lying on road, Damage to polyhouse
PM Modi Nashik Daura: कांदा प्रश्नावरून मोदींच्या सभेचे ठिकाण बदलाची शक्यता; जिल्ह्यात असंतोष, पोलिसांच्या गोपनीय शाखेचा अहवाल?

"सिन्नर तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसामुळे शेतातील वीज खांब पडल्याने वीज प्रवाह खंडित झाला आहे तसेच अनेक ठिकाणी झाडे पडले आहे. काही ठिकाणी पॉलिहाऊस चे नुकसान झाले असून. या अवकाळी पावसामुळे शेतातील अतोनात नुकसान झाले असून यामुळे शेतकरी राजावर पुन्हा अवकाळी संकट ओढवले असून. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे संबंधित प्रशासनाला आदेश देण्यात आले आहे." - आमदार माणिकराव कोकाटे.

ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले असून त्या ठिकाणी संबंधित प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून. लवकरात लवकर शेतकरी यांच्या बांधावर जात नुकसानीचे पाहणी करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी वीज प्रवाह खंडित झाला आहे त्या ठिकाणी वीज सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. असे संबंधित विभागातील अधिकारी यांनी सांगितले.

आंब्याच्या झाडाला आलेल्या कैऱ्यांचे अतोनात नुकसान

सिन्नर तालुक्यातील झालेल्या अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक आंब्यांना आलेल्या कैऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून सगळीकडे कैऱ्यांचा खच पडलेला होता यामुळे शेतकरी राजाने सांभाळलेले वर्षभर झाडाची अतोनात नुकसान झाल्याने. आलेल्या आंब्याचे पीक डोळ्यादेखत गेल्याने अनेकांना भावना अनावरण झाले. काही ठिकाणी आंब्याचे झाडे देखील पडलेले आहे.

due to Unseasonal rains trees lying on road, Damage to polyhouse
Nashik Police : दत्तक गुन्हेगारांच्या अंमलदारांना दणका! पोलीस उपायुक्तांची कारवाई; अंबडच्या चौघांवर कारवाई

देवपूर येथे शनिवार व रविवारी अवकाळी पाऊस झाल्याने येथील ज्ञानेश्वर शांताराम गडाख यांच्या घरासमोर पावसाचे तळे साचल्याने त्यांना शनिवारी रात्रभर जागे राहून रात्र काढावी लागली तसेच रविवारी ही पाऊस सुरू असल्याने त्यांना घराबाहेर पडता आले नाही संबंधित प्रशासनाने या सांड पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी गडाख कुटुंबियांनी केली आहे.

तसेच दातली येथे शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने येथील पशुधनासाठी असलेले गाईचे शेड हे वादळी वाऱ्यामुळे पडल्याने मोठे नुकसान झाले असून पशुधनालाही इजा झाली आहे. तर दातली येथे वादळी वाऱ्यामुळे झाडावरील पशुपक्षी यांना हानी पोहोचली असून अनेक पक्षी हे वादळी वाऱ्यामुळे झाडाखाली मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले.

due to Unseasonal rains trees lying on road, Damage to polyhouse
Nashik Onion Export : निर्यातबंदी खुलीची घोषणा शेतकऱ्यांसाठी फार्स! सरासरी बाजारभाव 1500 रुपयांवरच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com