Nashik Electricity Rate Hike : वीजदरवाढीचा ग्राहकांना शॉक...! एप्रिलपासून 20 टक्‍यांपर्यंत आर्थिक बोझा वाढणार

Electricity Rate Hike : महावितरणतर्फे १० ते २० टक्‍के वीज दरवाढ केल्‍याने सर्वसामान्‍य ग्राहकांना एप्रिलपासून आर्थिक बोझा पडणार असल्‍याचा दावा नाशिक जिल्‍हा ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी केला आहे.
Electricity
Electricityesakal

Nashik Electricity Rate Hike : महावितरणतर्फे १० ते २० टक्‍के वीज दरवाढ केल्‍याने सर्वसामान्‍य ग्राहकांना एप्रिलपासून आर्थिक बोझा पडणार असल्‍याचा दावा नाशिक जिल्‍हा ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी केला आहे. वीजदरवाढीचा ग्राहकांना शॉक दिला असून, ही दरवाढ ग्राहकांवर अन्‍याय करणारी आहे, असे श्री. पाटील यांचे म्‍हणणे आहे. (nashik Electricity tariff will increase by 20 percent by Mahavitaran from april marathi news)

यासंदर्भात जारी केलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे, की महावितरणाने वीज नियामक आयोगाकडे दरवाढीसंदर्भात याचिका दाखल केली होती. आयोगाने याचिका मंजूर केल्‍याने दरवाढ केली गेली आहे. सर्वसामान्‍य ग्राहक, व्‍यापारी, शेतकरी, उद्योग अशा सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना दरवाढ लागू असणार आहे. महावितरणाने गळती थांबवून आपल्‍या कारभारातील सुधारणा करणे गरजेचे आहे.

कोट्यवधींची थकबाकी वसुली केल्‍याने कुठल्‍याही प्रकारची दरवाढ करण्याची गरज भासणार नाही. परंतु तसे न करता सर्वसामान्‍य ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम महावितरण करत असल्‍याचे श्री. पाटील यांचे म्‍हणणे आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ग्राहक संघटनांतर्फे निवेदन दिले असून, उपाययोजना सुचविल्‍या आहेत. (latest marathi news)

Electricity
Nashik Milk Rate Hike : चाराटंचाईने दुधाचे दर वाढले! म्हशीचे दूध 80, तर गायीचे 55 रुपयांवर

दरवाढ मागे घेण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री व इतर अधिकारी वर्गाने बैठक घ्यावी. यामध्ये ग्राहक संघटनेचे पदाधिकारी, वीज ग्राहक समितीचे सदस्‍य व ग्राहक पंचायतीचे सदस्‍यांना बोलवावे, अशी मागणी राज्‍यस्‍तरीय वीज ग्राहक समन्‍वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे, नाशिक जिल्‍हा ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव विलास देवळे यांनी केले आहे.

अशी आहे दरवाढ

महाराष्ट्र राज्‍य वीज नियामक आयोगाने १ एप्रिलपासून विजेच्‍या दरात सुमारे दहा ते वीस टक्‍के वाढ केली आहे. यापूर्वी ग्राहकांना १ ते १०० युनिटसाठी ५ रुपये ५८ पैसे प्रति युनिट दराने बिल भरावे लागायचे. आता त्‍यांना प्रती युनिट ५ रुपये ८८ पैसे या दराने मोजावे लागेल. नव्‍या वाढीनुसार १०१ ते ३०० युनिटसाठी ११ रुपये ४६ पैसे, तर ३०१ ते ५०० युनिटसाठी १५ रुपये ७२ पैसे आणि पाचशेहून युनिटसाठी प्रति युनिट १७ रुपये ८१ पैसे मोजावे लागत आहेत. स्‍थिर आकारातही वाढ केली असून, पूर्वीच्या तुलनेत दहा ते वीस टक्‍के दरवाढ झालेली आहे.

Electricity
Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा शॉक! वीज दरात केली मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com