Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा शॉक! वीज दरात केली मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील जनतेला मोठा धक्का बसला आहे.
Electricity Bill Hike
Electricity Bill HikeSakal

Electricity Bill Hike: नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील जनतेला मोठा धक्का बसला आहे. आजपासून वीज दर महाग झाले आहेत. याचा परिणाम प्रत्येक घरावर होणार आहे. आता दर महिन्याला त्यांना वीज वापरासाठी अधिक शुल्क भरावे लागणार आहे.

महाराष्ट्र वीज नियामक आयोग म्हणजेच MERC ने 1 एप्रिल 2023 पासून नवीन दर लागू केले आहेत. वीज वितरणच्या प्रामुख्याने चार कंपन्या आहेत. MSEDCL म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड राज्य सरकारद्वारे चालवली जाते. ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची उपकंपनी आहे.

टाटा पॉवर, अदानी इलेक्ट्रिसिटीही वीज वितरण करतात :

याशिवाय टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी खाजगी क्षेत्रातही वीज वितरण करतात. याशिवाय मुंबईत बेस्टकडून प्रामुख्याने वीजपुरवठा केला जातो. वीज दरात 5 ते 10 टक्के वाढ करण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत प्रत्येक घराचे वीज बिल किमान 5-10 टक्क्यांनी वाढेल. आर्थिक वर्ष 2023-24 आणि आर्थिक वर्ष 2024-25 साठी दर वाढ करण्यात आली आहे.

महावितरणचे नवीन दर :

महावितरणने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 2.9 टक्के आणि 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 5.6 टक्के वाढ केली आहे. या वाढीमुळे आर्थिक वर्ष 2025 पर्यंत निवासी विजेच्या दरात 6 टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये औद्योगिक वीज दर 1 टक्के आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये 4 टक्के वाढले आहेत.

टाटा पॉवरचा नवा दर :

टाटा पॉवरच्या वीज दरांबद्दल बोलायचे झाल्यास, FY2024 साठी दर 11.9 टक्के आणि FY2025 साठी 12.2 टक्के वाढवले ​​आहेत. या दरवाढीमुळे, निवासी विजेच्या वीज दरात आर्थिक वर्ष 2024 मध्ये 10 टक्के आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये 21 टक्के वाढ झाली आहे. उद्योगासाठी, आर्थिक वर्ष 2024 मध्ये 11 टक्के आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये 17 टक्क्यांनी दर वाढले आहेत.

Electricity Bill Hike
Amul Milk: अमूल दुधाच्या दरात पुन्हा वाढ, आता लिटरमागे दोन रुपये महागणार, आजपासून लागू होणार नवे दर

अदानी विजेचे नवीन दर :

अदानी इलेक्ट्रिसिटीमध्ये, FY2024 साठी 2.2 टक्के आणि FY2025 मध्ये 2.1 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. यामुळे, निवासी वीज दर आर्थिक वर्ष 2024 मध्ये 5 टक्के आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये 2 टक्क्यांनी वाढला आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये उद्योगासाठी विजेच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. FY2025 मध्येही कोणताही बदल झालेला नाही.

बेस्टचे नवीन दर :

बेस्ट अर्थात बृहन्मुंबई वीज पुरवठा परिवहनने FY2024 मध्ये 5.1 टक्के आणि FY2025 मध्ये 6.3 टक्के वीज दरात वाढ केली आहे. यामुळे, निवासी विजेचा दर FY2024 मध्ये 6.19 टक्के आणि FY2025 मध्ये 6.7 टक्क्यांनी वाढेल.

Electricity Bill Hike
महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com