Nashik Fire Accident : इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान

Fire Accident : खुटवडनगर परिसरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या इलेक्ट्रॉनिक दुकानाला शनिवारी (ता. २७) सायंकाळी सहाच्या सुमारास भीषण आग लागल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
Fire department personnel douse the fire that broke out at an electronic shop on Saturday.
Fire department personnel douse the fire that broke out at an electronic shop on Saturday.esakal

Nashik Fire Accident : खुटवडनगर परिसरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या इलेक्ट्रॉनिक दुकानाला शनिवारी (ता. २७) सायंकाळी सहाच्या सुमारास भीषण आग लागल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. वेळीच अग्निशमन दलाच्या एकूण सहा बंबांनी नऊ फेऱ्या मारून आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टाळला. खुटवडनगर परिसरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या देवआशा इलेक्ट्रॉनिक दुकानाला शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास लागली. ( electronic shop at Khutwad Nagar area suffered loss of crores due to fire )

दुकानाचे मालक ओमप्रकाश सदिजा व तन्मय सुराणा यांनी या घटनेची माहिती अंबड पोलिस ठाणे व अग्निशमन विभागाला दिली. वेळीच घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब पोचले. सुरवातीला सातपूर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोचले. त्यानंतर आग आटोक्यात येत नसल्याने सिडको आणि मुख्यालय येथून प्रत्येकी दोन, दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. (latest marathi news)

Fire department personnel douse the fire that broke out at an electronic shop on Saturday.
Nashik Fire Accident : दापूरला घराला आग! दुचाकीसह संसारोपयोगी साहित्य खाक

एकूण सहा बंबांनी दहा फेऱ्या मारून अडीच तासांत आग विझविण्यात यश मिळवले. या आगीत दुकानातील टीव्ही, फ्रीज, कूलर, वॉशिंग मशिन व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे दोन कोटींचे नुकसान झाले. आग लागली, त्या वेळी इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये पाच ते सात कर्मचारी उपस्थित होते. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

मात्र घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांनी गर्दी केली होती. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. तसेच लाठीमारदेखील करावा लागला. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. पुढील तपास अंबड पोलिस करीत आहेत.

Fire department personnel douse the fire that broke out at an electronic shop on Saturday.
Nashik Fire Accident : आगीने 15 घरांची राखरांगोळी; भारतनगर येथील घटना; पाच जण जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com