Nashik News : छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा उभारणीस वेग; कामाचे भूमिपूजन

Nashik : पंचवटी कारंजावरील पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कमी उंचीचा व जुना झाल्याने या ठिकाणी भव्य पुतळा उभारून नव्याने शिवस्मारक उभारण्याचे अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती.
Dignitaries present at the Bhoomipuja of the new Equestrian Statue of Chhatrapati Shivaji Maharaj.
Dignitaries present at the Bhoomipuja of the new Equestrian Statue of Chhatrapati Shivaji Maharaj.esakal

Nashik News : पंचवटी कारंजावरील पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कमी उंचीचा व जुना झाल्याने या ठिकाणी भव्य पुतळा उभारून नव्याने शिवस्मारक उभारण्याचे अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती. अखेर बहुप्रतिक्षित नवीन अश्वारूढ पुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी (ता. ४) झाले. पुतळा उभारणीच्या कामासाठी सुमारे १ कोटी ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. (nashik Equestrian statue of Chhatrapati Shivray marathi news)

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे, पद्मभूषण पुरस्कार प्राप्त ख्यातनाम शिल्पकार श्रीराम सुतार यांनी घडविला आहे. धुळे या मूळ गावचे श्रीराम सुतार यांनी गुजरात येथील प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार पटेल यांचा पुतळादेखील उभारलेला आहे.

पंचवटी कारंजा येथे बसवण्यात येणारा हा अश्वारूढ पुतळा माजी नगरसेवक गुरमित बग्गा, विमल पाटील आणि नंदिनी बोडके यांच्या निधीतून साकारण्यात येणार असून, पंचवटीतील सर्व लोकप्रतिनिधी नागरिक व पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अस्तित्वात येत आहे.

सोमवारी भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी आमदार राहुल ढिकले, ज्येष्ठ नेते सुनील बागूल, माजी नगरसेवक बग्गा, विमल पाटील, नंदिनी बोडके, नरेश पाटील, खंडू बोडके, माजी नगरसेवक रुची कुंभारकर, हेमंत शेट्टी, किरण सोनवणे, पंचवटी शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष गौरव गोवर्धने, कार्याध्यक्ष मंगेश धनवटे, मामा राजवाडे, अजय बागूल, गुलाब भोये, सचिन ढिकले, विलास जाधव, महेश महंकाळे, उमेश कोठुळे, अमित खांदवे, किरण काळे, रावसाहेब कोशिरे, विशाल गोवर्धने, आर. आर. पाटील, शिवा पालकर, रमेश कुलकर्णी, राजू घुले, संजय संघवी, हरिभाऊ लासुरे, नंदू पवार, दीपसिंग रंधवा उपस्थित होते. (Latest Marathi News)

Dignitaries present at the Bhoomipuja of the new Equestrian Statue of Chhatrapati Shivaji Maharaj.
Nashik News : पानवेली काढण्यासाठी प्रशासनाची लगबग; गोदापात्रात दीर्घ प्रतीक्षेनंतर विसर्ग

असे असेल नवीन शिवस्मारक

सध्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढून त्या जागी नवीन अश्वारूढ पुतळा बसवण्यात येणार आहे. सदर पुतळा हा १२ फूट उंच चौथऱ्‍यावर उभारण्यात येणार असून, पुतळ्याची उंची साधारण १४ फूट असणार आहे. स्मारकाची एकूण उंची ११ मीटर असून, पंचवटी कारंजावर ग्रॅनाईट मार्बल बसवण्यात येणार आहे. गोलाकार असलेल्या या कारंजात उद्यान, लाइट व्यवस्थादेखील करण्यात येणार आहे. संसद भवनमधील पुतळ्यासारखा दिसणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे.

पाठपुराव्याला यश

पुतळा उभारण्याबाबत २०२१ मध्ये पंचवटी शिवजन्मोत्सव समितीने मनपाकडे मागणी केली होती. त्या वेळी पंचवटीतील सर्व २४ लोकप्रतिनिधींनी यासाठी सहमती दर्शविल्याने तसा पत्रव्यवहार शिवजन्मोत्सव समितीने मनपाकडे केला होता. त्यानंतर गेल्यावर्षी मनपा प्रशासनाने पुतळ्याला मंजुरी दिली असून शिवजन्मोत्सव समिती व पंचवटीतील सर्व लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे, अशी माहिती माजी अध्यक्ष मामा राजवाडे यांनी दिली.

Dignitaries present at the Bhoomipuja of the new Equestrian Statue of Chhatrapati Shivaji Maharaj.
Nashik News : ‘सुंदर शाळा’ स्पर्धेमध्ये जऊळके विभागात प्रथम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com