Caste Certificate Verification : जातपडताळणी त्रुटी पूर्ततेसाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ

Caste Certificate Verification : कागदपत्रांअभावी जातपडताळणी प्रमाणपत्र प्रलंबित असलेल्यांना सोमवार (ता. ११)पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
Caste Certificate Verification
Caste Certificate Verificationesakal

Caste Certificate Verification : कागदपत्रांअभावी जातपडताळणी प्रमाणपत्र प्रलंबित असलेल्यांना सोमवार (ता. ११)पर्यंत मुदत देण्यात आली आहे. समाजकल्याण विभागांतर्गत असलेल्या जिल्हा प्रमाणपत्र जातपडताळणी समिती येथे ही कागदपत्र जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक प्रमाणपत्र अभियानांतर्गत बारावी विज्ञान शाखेतील सीईटी दिलेल्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी ही विशेष मोहीम आयोजित केली आहे. (nashik completion of caste verification errors marathi news)

राज्यातील २०२४ या वर्षी इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील सीईटी दिलेल्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणे त्रुटी पूर्ततेअभावी अर्जदार स्तरावर प्रलंबित आहेत. या विशेष मोहिमेतून या विद्यार्थ्यांना त्रुटी पूर्ण करता येतील. (latest marathi news)

Caste Certificate Verification
Caste Validity Certificate Repair News: जातवैधता प्रमाणपत्र दुरुस्तीसाठी विशेष मोहीम

या अनुषंगाने अर्जदारांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर संबंधित अर्जदारांना त्रुटी कळविण्यात आल्या आहेत. त्यांची पूर्तता अद्यापपर्यंत ज्या अर्जदारांनी केलेली नाही त्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत. अशा अर्जदारांनी त्रुटीसह व मूळ कागदपत्रांसह ११ मार्चपर्यंत सकाळी दहा ते दुपारी चार, या वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच कोणत्याही अर्जदाराने त्रयस्थ व्यक्तीकडे संपर्क करू नये. त्रयस्थ व्यक्तीच्या आमिषास बळी पडू नये, असे आवाहनही उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत केले आहे.

Caste Certificate Verification
Caste Certificate Verification : उमेदवारांनी स्वतः अर्ज भरणे क्रमप्राप्त; जात प्रमाणपत्र पडताळणी उपायुक्तांचे मत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com