S. Jaishankar News : POK म्हणजे लक्ष्मणरेषा नाही : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर; आर्थिक शिस्तीमुळे भारताची आर्थिक स्थिती मजबूत

Nashik News : श्वास फाऊंडेशनच्या वतीने ‘विश्वबंधू भारत’ या संकल्पनेअंतर्गत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते
S Jaishankar in interview
S Jaishankar in interviewesakal

नाशिक : पूर्वीच्या एका चुकीमुळे भारताचाच हिस्सा असलेला पाकव्याप्त काश्मिर (पीओके) भारत आज ना उद्या आपल्या ताब्यात घेईल. पीओके म्हणजे काही लक्ष्मणरेषा नाही की जी भारत कधीही ओलांडणार नाही, असा ठाम मत व्यक्त करतानाच, कौशल्यभिमूख, स्व-विकसित आधुनिक तंत्रज्ञान आणि आर्थिक शिस्तीमुळे भारताची अर्थव्यवस्था मजबूत असून, २०७० मध्ये जगात दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल असा दावा देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केला. (nashik External Affairs Minister S Jaishankar vishbandhu bharat interview)

श्वास फाऊंडेशनच्या वतीने ‘विश्वबंधू भारत’ या संकल्पनेअंतर्गत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय राज्यवित्त मंत्री डॉ. भागवत कराड, विजय चौथाईवाले, कॅमलिनचे चेअरमन श्रीराम दांडेकर व श्वास फाऊंडेशनचे प्रदीप पेशकर उपस्थित होते.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. यामागे देशाला लाभलेले नेतृत्व आणि ठोस निर्णयक्षमता कारणीभूत असून, कोणत्याही विपरित परिस्थितीला सामोरे जाण्याची सक्षमता आज भारताकडे आहे.

‘वसुधैव कुटूंबम्‌’प्रमाणे, भारत संपूर्ण विश्वाकडे एक परिवार म्हणून पाहतो. याच भूमिकेतून भारताचे परराष्ट्र धोरण असल्याने जगातील सर्व देशांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित आहेत. परराष्ट्र धोरणात प्रचंड संयम आणि स्वत:वर आत्मविश्वास ठेवून देशाचे हित जोपासायचे असते. भारताचे हित हेच केंद्रबिंदू याच दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय पातळीवर वावरत असल्याचे ते म्हणाले.

महाभारत आणि रामायण यांचे विश्लेषण आजच्या भारताशी करताना दोन पुस्तकांची निर्मिती झाली. महाभारतातील कृष्ण आणि रामायणातील हनुमान हे जगातील सर्वश्रेष्ठ राजदूत असल्याचे सांगत, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, पीओके ही काही लक्ष्मणरेषा नाही.

भारत ती कधीही ओलांडून तो प्रदेश आपल्यात ताब्यात घेऊ शकतो. ते आज ना उद्या होणारच आहे. तर, जसे शिशुपाळचे अपराध पूर्ण झाल्यानंतर श्रीकृष्णाने त्याचा वध केला, तसेच दहा वर्षांपूर्वीपर्यंत झालेल्या हल्ल्यांचा बदला भारताने उरी, बालाकोट हल्ल्यातून घेतल्याचे ते म्हणाले. शेवटी प्रश्नोत्तरातून अनेकांच्या प्रश्नांनी त्यांनी उत्तरे दिली.

तत्पूर्वी, केंद्रीय राज्य वित्तमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, भारताने गेल्या दहा वर्षात आर्थिक प्रगती करताना दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. पारदर्शक आणि डिजीटल व्यवहारामुळे भ्रष्टाचार शून्यावर आल्याचा दावा करीत प्रत्येक क्षेत्रात भारताने प्रगती केली असून, भारताला गतवैभव प्राप्त करण्यासाठी कार्यरत असल्याचे म्हणाले. प्रास्ताविक श्वास फाऊंडेशनचे प्रदीप पेशकर यांनी केले. प्रारंभी मंत्रोपच्चारात दीपप्रज्वलन करण्यात आले. (latest marathi news)

S Jaishankar in interview
S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

२०७० मध्ये दुसरी अर्थव्यवस्था

आर्थिक शिस्तीमुळे सध्या भारतीय अर्थव्यवस्था ही चार ट्रिलियन असून, अमृतकालमध्ये हीच अर्थव्यवस्था ही ५२ ट्रिलियनपर्यंत पोहोचलेली असेल तर, २०७० मध्ये भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल असा दावा परराष्ट्रमंत्र्यांनी केला.

भारत-युएई-युरोप कॉरिडोअर

किमान ५०० वर्षांपूर्वी भारताचा अरब देशातून युरोपपर्यंत व्यापार चालत असे. त्याचधर्तीवर भारत-युएई-युरोप कॉरिडोअरची संकल्पनेवर काम सुरू आहे. लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होऊन हा कॉरिडोअर अस्तित्वात येईल असा विश्वास परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला.

विसा अन्‌ दुहेरी नागरिकत्व

परदेशात जाण्यासाठी लागणारा विसा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून त्वरित मंजूर होतो परंतु परराष्ट्रांची यासंदर्भात प्रक्रिया संथ असल्याने वेळ लागतो. यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे, चार करोडपेक्षा अधिक भारतीय नागरिक परदेशात राहतात तर दीड ते दोन करोड नागरिकांकडे दुसऱ्या देशाचे नागरिकत्व आहे. यातील बहुतांशीना दुहेरी नागरिकत्व हवे आहे. त्यासंदर्भातही प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

कॅनडा, चीन

गेल्या काही दिवसांमध्ये कॅनडाशी भारताचे संबंध बिघडले आहेत. यामागे अनेक प्रकाराचे आंतरराष्ट्रीय व स्थानिक राजकारण कारणीभूत आहे. तर, चीनशी थेट वाद नसला तरी सीमेवर मात्र आपले सैन्य ताकदीनिशी तैनात असल्याचे ते म्हणाले. 

S Jaishankar in interview
S. Jaishankar : मोदींविरोधी प्रचाराचा परकी संस्थांचा प्रयत्न ; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा आरोप,मुंबईत विविध माध्यमांच्या संपादकांशी संवाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com