Nashik Vaibhav Deore Case : खंडणीखोर वैभव देवरेची पुन्‍हा कारागृहात रवानगी

Nashik Crime : खंडणीखोर व सावकार असलेल्‍या वैभव देवरे याची पोलिस कोठडी संपत असल्‍याने शुक्रवारी (ता. २६) त्‍याला न्‍यायालयात हजर करण्यात आले.
Vaibhav Deore Arrested
Vaibhav Deore Arrestedesakal

Nashik Vaibhav Deore Case : खंडणीखोर व सावकार असलेल्‍या वैभव देवरे याची पोलिस कोठडी संपत असल्‍याने शुक्रवारी (ता. २६) त्‍याला न्‍यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी त्‍याला न्‍यायालयीन कोठडी सुनावल्‍याने पुन्‍हा एकदा त्‍याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात झाली आहे. संशयित देवरेविरोधात पाच गुन्‍हे दाखल असल्‍याने येत्‍या काही दिवसांत तिसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी इंदिरानगर पोलिसांकडून त्‍याला पुन्‍हा अटक होण्याची शक्‍यता आहे. ( Extortionist Vaibhav Deore sent to jail again )

अवैध सावकारी प्रकरणात देवरे याच्यावर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्‍हे दाखल आहेत. त्‍यामुळे गेल्‍या तीन आठवड्यांपासून पोलिस चौकशीला त्‍याला सामोरे जावे लागत आहे. चौकशीत त्‍याचे अनेक कारनामेदेखील समोर आले आहेत. त्‍याच्‍याविरोधात पाच वेगवेगळे गुन्‍हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये अवैध सावकारीतून कर्जदारास दिलेल्‍या तीन लाखांच्‍या मोबदल्‍यात वसुलीपोटी बारा लाख रुपये उकळल्‍याने गुन्‍हा दाखल केला होता.

महिला तक्रारदाराने संशयित देवरेविरोधात जबरी चोरी, दमदाटी, विनभंगाची फिर्याद दिली होती. यापूर्वी पोलिस कोठडीनंतर कारागृहात रवानगी झाल्‍यानंतर, दुसऱ्या गुन्ह्याच्‍या चौकशीसाठी त्याला दुसऱ्यांदा अटक करण्यात आली होती. या वेळी पोलिसांच्‍या तपासात महत्त्वाची माहिती हाती लागली आहे.

Vaibhav Deore Arrested
Nashik Crime News : अट्टल सोनसाखळी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या! स्थानिक गुन्हेशाखेची कामगिरी; 15 गुन्ह्यांची उकल

त्‍याअनुषंगाने उत्तरीय तपास पोलिस यंत्रणेकडून सुरू होता. पोलिस कोठडी शुक्रवारी (ता. २६) संपत असल्‍याने त्‍याला तपास पथकाने न्यायालयात हजर केले होते. या वेळी झालेल्‍या सुनावणीत न्यायालयाने देवरेची न्यायालयीन कोठडी मंजूर करत, त्‍याची रवानगी कारागृहात केली आहे.

सोनल देवरेच्‍या अर्जावर सोमवारी सुनावणी

वैभव देवरेविरोधातील गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक करत आहे. दरम्‍यान देवरेची पत्नी संशयित सोनल व इतर संशयितांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर सोमवारी (ता. २९) सुनावणी होणार आहे.

Vaibhav Deore Arrested
Nashik Crime News : वन विभागाच्या कारवाईत खैर जप्त; 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com