Nashik Rates Hike News : वाढत्या महागाईला लसूण, लिंबाची फोडणी! 10 रुपयांना दोन लिंबू तर लसूण 120 रुपये पाव

Latest Marathi News : उन्हाचा कडाका वाढताच लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे
Garlic lemon
Garlic lemonesakal

नाशिक : उन्हाचा कडाका वाढताच लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे. अचानक मागणी वाढल्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी दहा रुपयांना चार मिळणारे लिंबू आता दोनच मिळत आहेत. तर किरकोळ बाजारात लसूणही १२० पावशेर झाल्याने वाढत्या महागाईला लसूण अन्‌ लिंबाने जणू फोडणीच दिल्याचे दिसून येते. किरकोळ बाजारात द्राक्ष शंभर रुपयांना दोन किलो मिळत असल्याने लिंबू, लसूण द्राक्षापेक्षा महाग झाले आहेत. (Nashik Garlic lemon rates hike marathi news)

लग्नसराई व धार्मिक कार्यक्रमांमध्ये लिंबू सरबत मोठ्या प्रमाणात वाटले जाते. उसाच्या दरात वापरासाठी लिंबाचा वापर होतो. परिणामी, अचानकपणे लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज साधारणतः २० ते २५ क्विंटल लिंबाची आवक होते.

त्याला किमान ५५०० ते ८५०० रुपये दर मिळत आहे. आवक कमी- जास्त होत असल्यामुळे दरात चढ उतार होताना दिसतो. अशीच परिस्थिती लसूण बाबतही बघायला मिळते. शनिवारी (ता.१७) नाशिकच्या बाजार समितीत २३६ क्विंटल लसणाची आवक झाली.

त्याला १० हजार ५०० ते १९ हजार ७०० रुपये भाव मिळाला. सरासरी १६ हजार ५०० रुपये क्विंटल या दराने लसणाची विक्री होत आहे. किरकोळ बाजारात शंभर ते १२० रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडल्याचे दिसून येते. द्राक्ष किरकोळ बाजारातही शंभर रुपयांना दोन किलो मिळत आहेत. (Latest Marathi News )

Garlic lemon
Nashik Political News : विविध संवर्ग परिक्षा अन् निकालास ‘लोकसभा’ आचारसहिंतेचा फटका?

पालेभाज्यांचे दर टिकून

बाजारात भाजीपाल्याचे दर टिकून आहेत. पालेभाज्यांना वाढती मागणी असली तरी २० ते ३० रुपये पावप्रमाणे मेथी, कांदापात व इतर पालेभाज्या मिळतात. वाटाणे ६० रुपये किलोवर पोचला आहे. तर कांदा, टोमॅटो, बटाटे २० ते ४० रुपये किलोप्रमाणे मिळतात.

जास्त घेतल्यास भाव अजून कमी होवू शकतात. या तुलनेत द्राक्षांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे दिसून येते. किरकोळ विक्री करणारे शंभर रुपयांना दोन किलो द्राक्ष देतात. तर जास्त घेतल्यास दर अजून कमी करण्याची त्यांची मानसिकता दिसून येते.

नाशिकच्या बाजारात लिंबाची आवक

सोमवार : २४ क्विंटल

रविवार : ४० क्विंटल

शनिवार : ३२ क्विंटल

शुक्रवार : २० क्विंटल

भाव : ५५०० ते ८५००= ७५०० (सरासरी)

लसूण

शुक्रवार : १३० क्विंटल आवक

भाव : १३५०० ते २४००० = १८२०० (सरासरी)

Garlic lemon
NDCC Bank: कर्जदारांविरोधात गुन्हे दाखल आदेशाला स्थगिती! जिल्हा बॅंकेचे नियमबाह्य कर्जवाटप प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com