Girish Mahajan : नाशिकच्या जागेचा 2 दिवसांत निर्णय : गिरीश महाजन

Girish Mahajan : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात महायुतीच्या सर्वच घटक पक्षांची ताकद आहे.
Girish Mahajan
Girish Mahajanesakal

Girish Mahajan : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात महायुतीच्या सर्वच घटक पक्षांची ताकद आहे. त्यामुळे शिवसेनेला वाटते आपल्याला जागा मिळावी तर राष्ट्रवादीला देखील हेच वाटते. नाशिकमध्ये भाजपचे तीन आमदार व सत्तरहून अधिक नगरसेवक असल्याने भाजपचा देखील बालेकिल्ला आहे. परंतु असे असले तरी महायुती म्हणून उमेदवार उभा राहणार आहे. ()

भाजपची ताकद असली तरी मित्रपक्षाला म्हणून काही हक्काच्या जागा द्यावा लागणार असल्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आज नाशिकमध्ये स्पष्ट केले. त्याचबरोबर नाशिकच्या जागेचा निर्णय दिल्लीत पार्लमेंटरी बोर्ड घेईल, असेही त्यांनी सांगून दिल्लीकडे चेंडू टोलवला. पक्षाच्या कार्यक्रमासाठी महाजन नाशिकमध्ये आले होते. त्या वेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नाशिकच्या जागेबाबत भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे ७० नगरसेवक व तीन आमदार असल्याने नाशिकचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नाशिकची जागा भाजपलाच मिळावी, असे वाटते, तर विद्यमान खासदार हा शिवसेनेचा असल्याने पारंपरिक पद्धतीने शिवसेनेकडे जागा जावी, अशी भूमिका शिवसेनेची आहे. राष्ट्रवादीला देखील नाशिक बालेकिल्ला वाटत असल्याने त्यांच्याकडून जागेची मागणी होत आहे.

मात्र नाशिकच्या जागेचा निर्णय हा दिल्लीच्या पार्लमेंटरी बोर्डाकडे होईल. त्याचबरोबर राज्याचे वरिष्ठ नेते देखील नाशिकच्या जागेसंदर्भात चर्चा करत आहे. त्यामुळे जो उमेदवार दिला जाईल त्याचा महायुती म्हणून सर्वांनी प्रामाणिकपणे प्रचार करावा. दोन दिवसांत नाशिकच्या जागेसंदर्भात निर्णय होणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार टीका केली जात आहे. (latest marathi news)

Girish Mahajan
Girish Mahajan : ''त्यांना चप्पल घ्यायला पैसे राहणार नाहीत...'' गिरीश महाजन एकनाथ खडसेंना नेमकं काय म्हणाले?

त्यावर बोलताना महाजन म्हणाले, निवडणुका जवळ येतील तोपर्यंत ठाकरे काय बोलतील व कुठपर्यंत त्यांची मजल जाईल, हे सांगता येत नाही. ठाकरे यांनी पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. त्यांच्या सिनेमाचे नाटक होणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यांच्याकडे आता कुठलेच मुद्दे नसल्याने वॉशिंग मशिनचे खोके ते बडबडत आहे. सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना महाजन यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था उत्तम आहे. तुम्ही तुमच्या पक्षाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला.

आमचा संघर्ष पवारांविरोधात

दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला भर घातलेली दिसून येत आहे. २०१९ आमची लढाई पवार यांच्या विरोधात होती. स्वतः शरद पवार दक्षिण नगरमध्ये तळ ठोकून होते. परंतु जनतेने पंतप्रधान मोदी यांच्या विकासकामांकडे बघून मतदान केले, असे महसूलमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या प्रवक्त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे.

त्याचाच परिणाम उद्धव ठाकरे यांच्यावर देखील झाल्याची टीका त्यांनी केली. नाशिकमधून महायुतीकडून जो उमेदवार दिला जाईल, त्याचे काम प्रामाणिकपणे केले जाईल. नाशिकच्या जागेसंदर्भात निर्णय घेण्याची प्रक्रिया महायुतीमध्ये सुरू आहे. भाजपला नाशिकची जागा मिळावी, हा आग्रह आहे. मात्र यावर पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य राहील, असे विखे पाटील म्हणाले.

Girish Mahajan
Girish Mahajan News : बेकायदेशीर कामांमुळेच खडसेंच्या मालमत्तेवर टांच : गिरीश महाजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com