Nashik News : लॉन्सबाहेर चैनस्नॅचर्सचा वावर; आडगाव हद्दीत 2 महिलांच्या सोनसाखळ्या खेचल्या

Nashik : घटनांमुळे लाॅन्सबाहेर सोनसाखळी चोरट्यांचा वावर असल्याचे अधोरेखित झाले असून, सध्या लग्नसराईचे दिवस असल्याचे या घटना वाढण्याची शक्यता आहे.
crime
crimeesakal

Nashik News : निलगिरी बागेलगत असलेल्या कॅनॉलजवळ लॉन्सबाहेर महिलेच्या गळ्यातील ९० हजारांची पोत, तर छत्रपती संभाजी नगर रोडवरील लॉन्सबाहेर आलेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन लाखांची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोरट्यांनी खेचून नेली. या दोन घटनांमुळे लाॅन्सबाहेर सोनसाखळी चोरट्यांचा वावर असल्याचे अधोरेखित झाले असून, सध्या लग्नसराईचे दिवस असल्याचे या घटना वाढण्याची शक्यता आहे. (nashik Gold chain of 2 women were thief in Adgaon area marathi news)

त्यामुळे पोलिसांनी ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी होते आहे. शोभा उत्तम खोडे (रा. शुभम बंगलो, सावरकर नगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्या शनिवारी (ता.२०) निलगिरी बागेजवळ असलेल्या यश लॉन्स येथे आल्या होत्या. सायंकाळी पावणे आठच्या सुमारास त्या लॉन्सबाहेर येऊन पायी चालत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने खेचून नेले.

तर, दुसरी घटना रविवारी (ता. २१) दुपारी अडीच वाजता छत्रपती संभाजीनगर रोडवरील धनलक्ष्मी लॉन्सबाहेर घडली. शारदा वामन टेकवडे (रा. व्यंकटेश जॉईनीस्ट, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) यांच्या फिर्यादीनुसार, त्या नातलगांच्या लग्न सोहळ्यासाठी नाशिकला आल्या होत्या. छत्रपती संभाजीनगर रोडवरील धनलक्ष्मी लॉन्स येथे विवाहसोहळा होता.

रविवारी (ता. २१) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्या लॉन्सबाहेर येथून थांबल्या असता, दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील १ लाख ९८ हजार रुपांचे सोन्याचे गंठण बळजबरीने ओढून खेचून नेले. याप्रकरणी दोन्ही घटनाप्रकरणी आडगाव पोलिसात जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

crime
Nashik News : संभाजीनगर रोडवरील अतिक्रमणांचा बंदोबस्त! येवल्यात नगरपालिकेची कारवाई, भाजी विक्रेत्यांना तंबी

चेतनानगरला चैनस्नॅचिंग

चेतनानगरमधील अयोध्यानगरमध्ये बंगल्याबाहेर असलेल्या ८० वर्षीय महिलेच्या गळ्यातील ५४ हजारांची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी खेचून नेली. रोहिणी रमाकांत जोशी (८०, रा. रमाई बंगला, अयोध्यानगर, चेतनानगर) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता.२०) रात्री आठच्या सुमारास सदरची घटना घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी (ता. २१) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्या लॉन्सबाहेर येथून थांबल्या असता, दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील १ लाख ९८ हजार रुपांचे सोन्याचे गंठण बळजबरीने ओढून खेचून नेले. याप्रकरणी दोन्ही घटनाप्रकरणी आडगाव पोलिसात जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चेतनानगरला चैनस्नॅचिंग

चेतनानगरमधील अयोध्यानगरमध्ये बंगल्याबाहेर असलेल्या ८० वर्षीय महिलेच्या गळ्यातील ५४ हजारांची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी खेचून नेली. रोहिणी रमाकांत जोशी (८०, रा. रमाई बंगला, अयोध्यानगर, चेतनानगर) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता.२०) रात्री आठच्या सुमारास सदरची घटना घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime
Nashik Crime News : बॅग लिफ्टिंग गुन्ह्यातील दोघांना अटक; संशयितांकडून स्वीफ्ट कार जप्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com