Nashik News : रेडिरेकरनचे दर ‘जैसे थे’; बांधकाम व्यावसायिकांसह ग्राहकांना शासनाचा दिलासा

Nashik : मुद्रांक विभागाने बाजारमूल्य (रेडिरेकनर) दरात कुठलाही बदल न केल्याने नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
PWD
PWDesakal

Nashik News : शासनाच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक विभागाने बाजारमूल्य (रेडिरेकनर) दरात कुठलाही बदल न केल्याने नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. २०२४ व २५ या आर्थिक वर्षासाठी बाजारमूल्य दर कायम ठेवण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या महसूल उत्पन्नाचा एक भाग म्हणून बाजारमूल्य दर वर्षी निश्चित केले जातात. (Nashik Government relief to consumers along with builders marathi News)

२०१४ पर्यंत जानेवारीच्या एक तारखेपासून नवीन दर निश्चित केले जात होते. त्यानंतर आर्थिक वर्षाच्या पहिल्या तारखेपासून बाजार मूल्यदर जाहीर केले जातात. बाजार मूल्यदर तक्ते हे शासनाकडून जाहीर केलेले असतात. त्या दरांच्या आधारे स्थावर मालमत्तांचे शासनदरबारी व्यवहार होतात. या माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो.

२०२० व २१ मध्ये कोरोनाकाळात आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात थांबले होते. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांसह ग्राहकांना दिलासा म्हणून २०२१ व २२ या वर्षासाठी बाजारमूल्य दर न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतरच्या दुसऱ्या आर्थिक वर्षासाठीही हाच निर्णय कायम ठेवण्यात आला.

दोन वर्षे बाजारमूल्यात कुठलेही वाढ न झाल्याने या वर्षी दर वाढतील, अशी शक्यता होती. त्या अनुषंगाने ३१ मार्चच्या आत मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्तांचे व्यवहार झाले. परंतु शासनाने ३१ मार्चच्या पार्श्वभूमीवर नवीन निर्णय जाहीर केले. (latest marathi news)

PWD
Nashik News : नाशिक-ठाणे, कसारापर्यंत टॅक्सीची भाडेवाढ नाही; चालक-मालक संघटनेचा निर्णय

शासनाचे उपसचिव सत्यनारायण बजाज यांनी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांना २०२४- २५ आर्थिक वर्षात बाजारमूल्याच्या दरात कुठलाही बदल न करता गेल्या वर्षाप्रमाणे दर कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या या निर्णयाचे बांधकाम व्यावसायिक व संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे.

''बाजारमूल्य दरात कुठली वाढ न झाल्याने ग्राहकांसाठी फायदेशीर बाब आहे. बांधकाम व्यावसायिक संघटनांकडून या निर्णयाचे स्वागत.''- कृणाल पाटील, अध्यक्ष, क्रेडाई मेट्रो

''बाजारमूल्यात वाढ करू नये, अशी मागणी ‘नरेडको’च्या वतीने शासनदरबारी करण्यात आली होती. कुठलीही वाढ न झाल्याने सर्वसामान्य व्यक्तींचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल.''- सुनील गवादे, अध्यक्ष, नरेडको, नाशिक.

PWD
Nashik News : सोयगाव नववसाहतीत घंटागाडीची अनियमितता! डास प्रतिबंधक फवारणी नाही, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com